शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
7
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
8
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
9
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
10
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
11
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
12
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
13
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
14
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
15
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
16
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
17
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
18
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
19
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
20
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?

गावकरीच चालवतात लोकसहभागातून कोविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:24 IST

अनिल गायकवाड कुसळंब : काेरोनाच्या संकट काळात आदर्श मॉडेल ठरलेल्या कुसळंब येथे शासनाचा आरोग्य विभाग, ग्रामपंचायत आणि मानवलोक ...

अनिल गायकवाड

कुसळंब : काेरोनाच्या संकट काळात आदर्श मॉडेल ठरलेल्या कुसळंब येथे शासनाचा आरोग्य विभाग, ग्रामपंचायत आणि मानवलोक स्वयंसेवी संस्थेच्या एकत्रित प्रयत्नातून मराठवाड्यातील पहिले लोकसहभागातील कोविड केअर सेंटर उभे राहिले. हे सेंटर परिसरातील काेरोना बाधितांसाठी वरदान ठरले असून आतापर्यंत ७ लाख रूपयांची देणगी या सेंटरसाठी मिळाली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी स्वतःच्या कुसळंब गावातील सरपंच व इतर पदाधिकारी, ग्रामस्थांशी चर्चा केली. कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी गाव ही लगेच राजी झाले. श्री खंडेश्वर माध्यमिक शाळेत ५० बेडच्या सेंटरचा प्लान केला. मानवलोक स्वयंसेवी संस्थेने बेड, गाद्या, पंखे, ट्यूब, टॉयलेट्स, प्रोटोकॉलचे प्रिंटिंग, सावलीसाठी मंडप आदी भौतिक सुविधा पुरविल्या. ग्रामपंचायतीने पाणी, वीज, स्वच्छतेची सेवा पुरविली. आरोग्य विभागाकडून लागणारी औषधे आणि मनुष्यबळ पुरविण्यात आले.

या सेंटरचे पूर्ण नियोजन ग्रामपंचायतीने केले असून गावातील लोकच कोविड केअर सेंटर चालवतात. कुसळंब व परिसरातील नागरिकांच्या आतापर्यंत १,५०० चाचण्या केल्या. त्यापैकी ३५० नागरिक पॉझिटिव्ह आलेले आहेत. तर ४०० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी सुखरूप गेले आहेत. गावातच उपचार मिळू लागल्यामुळे ५० बेड कमी पडू लागले. त्यामुळे आणखी ५० बेड वाढवण्यात आले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोविड सेंटर झाल्यानंतर या परिसरात एकही रुग्ण कोरोनाने मयत झाल्याची नोंद नाही.

आयसीएमआरच्या प्रोटोकॉलनुसार उत्तम वैद्यकीय सुविधा, पोषक आहार, इतर अत्यावश्यक सुविधा या केंद्रात पुरवल्या जातात. सकाळी रुग्णांसाठी योगाचे क्लास तर रात्री जन, कीर्तन, संगीत कार्यक्रमांचे आयोजनातून रुग्णांना मानसिक आधार व समाधान मिळत आहे. मराठवाड्यातील अशा पहिल्या कोविड केअर सेंटरला ग्रामपंचायतने पाच लाख रूपये तर २ लाख रुपयांची देणगी गावातील रहिवासी असलेले व नोकरीनिमित्त बाहेर गावी असलेल्या लोकांनी दिली आहे.

शासकीय यंत्रणेवरील ताण कमी झाला

कुसळंब ग्रामपंचायतीचे मॉडेल सक्सेस स्टोरी म्हणून बीड जिल्ह्यात नावारूपाला आलेले आहे. डेथ रेट कमी होण्यासाठी, शासकीय यंत्रणेवरचा ताण कमी करण्यासाठी, लोकांचे मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी अशा प्रकारचे कोविड केअर सेंटर निश्‍चितपणे उपयुक्त ठरतील.

-

डॉ. राधाकिसन पवार

जिल्हा आरोग्य अधिकारी बीड.

म्हणून कुसळंबची निवड

कुसळंब हे बीड जिल्ह्यातील पहिले स्मार्ट ग्राम असून ५० लाखांचे बक्षीस या गावाला मिळालेले आहे. गाडगेबाबा स्वच्छता स्पर्धेत प्रथम आलेले आहे. गेल्या पंचवीस वर्षात गावात निवडणुका झालेल्या नाहीत. कोणतेही काम यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असतो आणि या गावात लोकसहभागाची खात्री होती, त्यामुळे डॉ. आर. बी. पवार यांनी कुसळंबची निवड केली.

फोटो : लोकसहभागातून चालविल्या जाणाऱ्या कुसळंब येथील केअर सेंटरमधून उपचारानंतर कोरोनामुक्त नागरिकांवर फुलांचा वर्षाव करून सुटी दिली जाते.

===Photopath===

020621\02bed_4_02062021_14.jpg