शहरं
Join us  
Trending Stories
1
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
2
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
3
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
4
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
5
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
6
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
7
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
8
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
9
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
10
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
11
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
12
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
13
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
14
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
15
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
16
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
17
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
18
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
19
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
20
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक

कोंडीत घुसमटले बीड शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 01:10 IST

बीड शहरातील वाहतूक व्यवस्था मागील काही महिन्यांपासून विस्कळीत झाली आहे. त्यामुळे बीडकर त्रस्त आहेत. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही वाहतूक पोलीस मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील वाहतूक व्यवस्था मागील काही महिन्यांपासून विस्कळीत झाली आहे. त्यामुळे बीडकर त्रस्त आहेत. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही वाहतूक पोलीस मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. वारंवार निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्यांच्याकडून सुरळीत वाहतूक करण्यासाठी उपाययोजना केल्या जात नसल्याचे समोर आले आहे. वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच आज बीड शहरात नियमांचे उल्लंघन करुन वाहने सुसाट पळविणाऱ्यांसह अवैध प्रवासी वाहतूक करणा-यांचा सुळसुळाट वाढला आहे.

नुकतेच रस्ता सुरक्षा अभियान पार पडले. वाहतूक शाखा, उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने ठिकठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. वास्तविक पाहता आरटीओ कार्यालयाने केवळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात हजेरी लावली. त्यानंतर मात्र ते गायब झाले. वाहतूक शाखेच्या वतीने आठवडाभर विविध कार्यक्रम घेण्यात आले. परंतु हे सर्व कार्यक्रम केवळ आलेल्या वेळापत्रकाप्रमाणे झाले. त्यामध्ये उत्साह दिसून आला नाही. हे अभियान केवळ करायचे म्हणून करायचे असाच काहीसा निष्कर्ष यातून नागरिकांना पहावयास मिळाला. या अभियानाच्या माध्यमातून वाहनधारकांमध्ये जनजागृती मोठ्या प्रमाणात होईल अशी अपेक्षा सर्वसामान्यांना होती. परंतु या अभियानाचे उद्घाटन आणि समारोपच नागरिकांना समजला. आठ दिवस काय कार्यक्रम झाले, किती प्रबोधन झाले, कोणी लाभ घेतला हे मात्र केवळ कागदावरच राहिले.

याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक के.पी.काळे म्हणाले, शहरातील सिग्नल सुरू करण्यासाठी नगर पालिकेला पत्र दिलेले आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पॉर्इंट निश्चत करून त्याठिकाणी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. वाहनधारकांनीही पोलिसांना सहकार्य केले पाहिजे, असे ते म्हणाले.कायमस्वरुपी अधिकारी मिळेनापो. नि. घनश्याम पाळवदे यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली झाल्यानंतर दिनेश आहेर यांच्याकडे काही दिवस वाहतूक शाखा सोपविण्यात आली. त्यानंतर त्यांची गेवराई ठाण्यात बदली झाली. गेवराई ठाण्याचे पोनि सुरेश बुधवंत यांच्याकडे वाहतूक शाखा देण्यात आली. परंतु बुधवंत यांच्याकडे पुन्हा पोलीस कल्याण व इतर कारभार देण्यात आला. त्यामुळे त्यांचे वाहतूक शाखेकडे दुर्लक्ष झाले. त्यातच आता आठवडाभरापासून ते सुटीवर आहेत. सध्या पो. उपनि. एस. काळे यांच्याकडे वाहतूक शाखेचा पदभार आहे. वारंवार अधिकारी बदलत असल्यामुळे वाहतूक शाखेचीच ‘कोंडी’ होत आहे. कायमस्वरुपी अधिकारीच मिळत नसल्याने ही समस्या उद्भवल्याचे बोलले जात आहे.

अपु-या कर्मचा-यांमुळे समस्यांमध्ये वाढबीड शहर वाहतूक शाखेकडे कर्मचारीही अपुरे आहेत. सध्या ३६ कर्मचारी कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. पैकी रजा, साप्ताहिक सुटी व इतर कारणांमुळे ८ ते १० जण सुटीवर असतात. त्यामुळे २० ते २५ कर्मचाºयांवरच शहरातील वाहतुकीचा डोलारा आहे. अपुरे कर्मचारी असतानाच व्हीआयपींचा बंदोबस्तही त्यांना करावा लागतो. शिवाय, कारवायांचे ‘टार्गेट’ही पूर्ण करावयाचे असते. हे सर्व करताना वाहतूक पोलिसांच्या नाकी नऊ येत आहेत.

बैठकांवर बैठका झाल्या, पण उपयोग काहीच नाहीसुभाष रोडवरील वाहतुकीची समस्या लक्षात घेता उप अधीक्षक खिरडकर यांनी या भागातील व्यापाºयांची बैठक घेतली. नाल्यांवर पत्रा टाकून व समोर पांढरे पट्टे ओढून पार्किंगची व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या. १० मे पर्यंत त्यांना मुदत दिली होती. परंतु याची कोठेच अंमलबजावणी झाल्याचे दिसून आले नाही. आजही पूर्वीसारखीच जैसे थे परिस्थिती पाहवयास मिळत आहे. उप अधीक्षकांकडच्या बैठकीचा व्यापाºयांवर काहीच परिणाम नसल्याचे दिसून येते. आता पोलिसांकडून काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.बायपासमुळे त्रास कमीबीड शहराला नवीन बायपास झाल्यामुळे अवजड वाहने शहराबाहेरुन जातात. त्यामुळे काही प्रमाणात बीडकरांचा त्रास कमी झाला आहे. परंतु वाहतूक पोलिसांनी जबाबदारीने काम केल्यास वाहनधारकांचा त्रास पूर्णपणे कमी झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु वाहतूक पोलीस प्राधान्याने काम करीत नसल्याचे दिसून येत आहे.

नियमांचे उल्लंघन नकोबीड शहरात वाहतूक पोलिसांकडून कारवाया केल्या जात असल्या तरी वाहनधारकांनीही आपली जबाबदारी ओळखून काळजी घेण्याची गरज आहे. नियमांचे उल्लंघन करू नये.

टॅग्स :BeedबीडMarathwadaमराठवाडाTrafficवाहतूक कोंडी