शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

उन्हाळी सुट्यांचा आनंद घेण्यात बच्चे कंपनी व्यस्त

By admin | Updated: May 14, 2014 00:01 IST

पुरुषोत्तम करवा , माजलगाव परीक्षा संपल्याने अभ्यासाचा ताण कमी झाला... आई बाबांची ओरड नाही... शिक्षकांकडून सूचना नाहीत... अशा मोकळ्या वातावरणात मुले बागडण्याचा आनंद लुटताना दिसून येत आहेत.

 पुरुषोत्तम करवा , माजलगाव परीक्षा संपल्याने अभ्यासाचा ताण कमी झाला... आई बाबांची ओरड नाही... शिक्षकांकडून सूचना नाहीत... अशा मोकळ्या वातावरणात मुले बागडण्याचा आनंद लुटताना दिसून येत आहेत. शाळा सुरू असताना रोजच घड्याळाच्या काट्यासह सकाळपासूनच विद्यार्थ्यांचा दिवस सुरू होतो. दिवसभर शाळेत शिकवणी, घरचा अभ्यास असे व्यस्त वेळापत्रक विद्यार्थ्यांचे असते. परीक्षा काळात तर आणखीनच अभ्यासाचा ताण वाढतो. पालकांचेही बारीक लक्ष असते. अभ्यासासाठी पालकांकडून सूचना येत असतात. या व्यस्त वेळापत्रकात विद्यार्थ्यांना मनमोकळेपणाने खेळायला मिळत नाही. त्यामुळे आठवड्यातून मिळणार्‍या एका सुट्टीची विद्यार्थी वाट बघत असतात. त्यातच वर्षभरातील अभ्यासाचा कस लागणारा कालावधी म्हणजे वार्षिक परीक्षा असते. वर्षभर जोरदार तयारी करून विद्यार्थी परीक्षेला सामोरे जातात. परीक्षा देत असतानाच सुटीचे वेध लागलेले असतात. त्यामुळे सुटीची आतुरतेने वाट पाहत असतात. परीक्षेनंतर थोडी मोकळीक व मौजमजाही विद्यार्थ्यांना हवी असते. सुटीच्या दिवसात कुठे जायचे याचे अगोदरच नियोजन झालेले असते. सध्या सर्वच मुलांच्या परीक्षा संपल्या आहेत. मैदाने, तरण तलाव, उद्याने, सिनेमागृह याठिकाणी या मुलांची गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने शरीराची लाही कमी करण्यासाठी मुले पोहण्याचा आनंद लुटत आहेत. तसेच क्रिकेट, फुटबॉल, कॅरम, बुुद्धिबळ या खेळांसह सायकल शिकण्यामध्येही ते मग्न आहेत. तर काही मुले या सुट्ट््यांंमध्ये संगणकाचे प्रशिक्षण घेताना दिसून येत आहेत. आम्ही निघालो मामाच्या गावाला.. पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की, बच्चे कंपनी मामाच्या गावाला जायचे. तिथे जाऊन भरपूप मस्ती, धिंगाणा करून उन्हाळ्याच्या सु्ट्ट्या घालवायच्या. मात्र आता मामाचे गावच दुरावत चालल्याचे दिसून येत आहे. मामाच्या गावाला जाऊन सुट्ट्याचा आनंद घेण्यापेक्षा आजचे चिमुकले कम्प्युटर आणि व्हिडीओ गेम्स सोबतच खेळताना दिसून येत आहेत. त्यामुळे मामाचे गाव या चिमुकल्यांना दुरावल्याचे दिसून येत आहे. साहित्य खरेदी... उन्हाळ्याच्या सुट्ट्यात मुले मोठ्या प्रमाणात मैदानी खेळ खेळतात. यामध्ये क्रिकेट खेळण्यात विद्यार्थी अधिक व्यस्त असतात. त्यामुळे बॅट, बॉल, स्टम्प आदी खेळण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यात मुले व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खेळाचे साहित्य असणार्‍या दुकानांवर चिमुकल्यांसह मोठ्यांची गर्दी दिसू लागली आहे. मनपसंतीचे शर्ट.... सध्या आयपीलचे सामने सुरू आहेत. या आयपीलचे सामने पाहण्यासाठी ही मुले रात्र जागून काढत आहेत. तसेच आपली आवडता संघ व आवडता खेळाडू यांचे शर्ट घेण्यासाठी ही मुले आपल्या पालकांकडे हट्ट धरत आहेत. मुलांचा हट्ट पालकवर्ग पूर्ण करीत आहेत. विराट कोहली, धोनी, युवराज यांच्या शर्टला या मुलांकडून अधिक मागणी मिळतेय. दहावीच्या क्लाससह डान्सिंग क्लासमध्ये वाढली गर्दी नववीची परीक्षेत उत्तीर्ण होऊन अनेकांनी दहावीच्या वर्गात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे दहावीचे क्लास जॉईन करण्यास अनेकांनी पसंती दिली आहे. अनेकजण सुट्यातही अभ्यास करताना दिसून येत आहेत तर काहीजण डान्स क्लास, संगीत क्लाससह आदी क्लास, मेंदी क्लास जॉईन केल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर) मामाच्या गाण्याऐवजी ओठांवर हिंदी गाणे.. पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्यात मामाच्या गावाला जाताना ही मुले ‘मामाच्या गावाला जाऊया, मौज मजा करूया, पूरण पोळी खाऊया’ यासारखे अनेक गाणे गायले जायचे. मात्र, आता काळ बदलला आहे. या मुलांच्या ओठांवर मराठी गाण्याऐवजी ‘दुनियादारी, हनी सिंगचे साँग, चेन्नई एक्सप्रेस, टाईमपास, आशिकी २, तुझे मेरी कसम’ आदी हिंदी चित्रपटातील गाणे गाताना दिसून येत आहेत. त्यामुळे जुनी गाणे लोप पावत चालले आहेत.