शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

ऊसतोडणीस नकार देणाऱ्या गर्भवती पत्नीच्या पोटावर मारल्या लाथा; अर्भक दगावले, पती व सासूवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2021 14:16 IST

तीन महिन्यांची गर्भवती असल्याने डॉक्टरांनी ओझे उचलण्यास मज्जाव केल्याचे सांगत ऊसतोडणीस जाण्यास नकार दिला

अंबाजोगाई ( जि. बीड) : तीन महिन्यांची गर्भवती असल्याने विवाहितेने ऊसतोडणीला जाण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या पतीने आणि सासूने तिला बेदम मारहाण केली. यावेळी पतीने पोटात लाथा मारल्याने विवाहितेच्या पोटातील तीन महिन्यांचे अर्भक दगावले. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील कुरणवाडी तांडा येथे घडली. याप्रकरणी पती आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

कविता बालाजी पवार (वय २१, रा. कुरणवाडी तांडा, ता. अंबाजोगाई) असे त्या पीडित विवाहितेचे नाव आहे. एक वर्षापूर्वी तिचे लग्न बालाजी नामदेव पवार याच्यासोबत झाले. कविताच्या फिर्यादीनुसार, १८ ऑक्टोबर रोजी तिला पती बालाजी आणि सासू सुमन यांनी ऊसतोडणीला सोबत चल म्हणून आग्रह धरला. परंतु, तीन महिन्यांची गर्भवती असल्याने डॉक्टरांनी ओझे उचलण्यास मज्जाव केल्याचे सांगत कविताने ऊसतोडणीस जाण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या पतीने आणि सासूने तिला मारहाण सुरू केली.

पतीने पोटात लाथ मारल्याने तिला असह्य वेदनापतीने पोटात लाथ मारल्याने तिला असह्य वेदना होऊ लागल्या. त्यामुळे कविता एकटीच स्वाराती रुग्णालयात दाखल झाली. तपासणीअंती तिच्या पोटातील तीन महिन्यांच्या अर्भकाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याने ३० ऑक्टोबर राेजी ते मृत बाळ काढून टाकण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या फिर्यादीवरून तिचा पती आणि सासूवर कलम ३१६, ३२३, ३४ अन्वये अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक केंद्रे करत आहेत. अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडpregnant womanगर्भवती महिला