शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

खुल जा सिमसिम

By admin | Updated: May 16, 2014 00:14 IST

बीड : जिल्ह्याचा खासदार कोण असणार? याचा ‘फैसला’ अवघ्या काही तासांमध्ये मिळणार आहे़ मतांचा पेटारा शुक्रवारी उघडणार असून सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे़

बीड : जिल्ह्याचा खासदार कोण असणार? याचा ‘फैसला’ अवघ्या काही तासांमध्ये मिळणार आहे़ मतांचा पेटारा शुक्रवारी उघडणार असून सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे़ जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी १७ एप्रिल रोजी मतदान पार पडले़ एकूण ३९ उमेदवारांमध्ये ‘फाईट’ झाली़ मात्र, खरी झुंज झाली ती भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश धस यांच्यात़ जिल्ह्यातील १७ लाख ७२ हजार १८९ मतदारांना मतदान करण्याचा हक्क होता़ एकूण ६९.२६ टक्के मतदान झाले़ १२ लाख ३७ हजार ७२९ मतदारांनी हक्क बजावला़ दरम्यान, बीडच्या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधलेले आहे़ खासदारपदाच्या खुर्चीत कोण बसणार? याचे उत्तर शुक्रवारी मिळणार आहे़ सकाळी आठ वाजेपासून शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मतमोजणीस सुरुवात होणार आहे़ विधानसभानिहाय १६ टेबल असून एकूण ९६ टेबलवर २६ फेर्‍यांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया होईल़ उमेदवार, एजंट यांना प्रवेश दिला जाणार आहे़ आक्षेपांचीही दखल घेतली जाणार आहे़ यंत्रणा सज्ज झाली असून मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पडेल असा विश्वास जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नवल किशोर राम यांनी ‘लोकमत’ जवळ व्यक्त केला. वाहतूक व्यवस्थेत बदल अंथरवण पिंप्री ते नाळवंडी नाका हा रस्ता रहदारीस बंद करण्यात आला आहे. अंथरवण पिंप्री मार्गे जाणारी वाहतूक घाटसावळीकडे वळविण्यात आली आहे. तर शहरातून येणारा रस्ता खंडेश्वरी जवळ बंद करण्यात आला असून येथे पार्र्कींगसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. अधिकार्‍यांची वाहने मतमोजणी स्थळापर्यंत जातील. एक फिरते पथक वळविलेल्या मार्गांनीच वाहतूक रहावी यासाठी एक फिरते पथक तैनात करण्यात आले आहे. १५ ठिकाणी पोलीस कर्मचार्‍यांचे जत्थे थांबणार आहेत. मतमोजणी केंद्राच्या बाहेर ५०० मीटर परिसरात लाकडी बॅरीकेटस् लावण्यात आल्या आहेत, अशी माहिती फौजदार प्रवीणकुमार बांगर यांनी दिली. (प्रतिनिधी) मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी गुरुवारी अधिकारी, कर्मचार्‍यांना बंदोबस्त वाटप केला़ यावेळी त्यांनी मतमोजणी प्रक्रियेत व्यत्यय येणार नाही, यासाठी पुरेपूर काळजी घेण्याच्या सूचना दिल्या़ सशस्त्र पोलिस मतमोजणीच्या ठिकाणी राहतील़ दरम्यान, मतमोजणीच्या ठिकाणी गडबड गोंधळ करणार्‍यांवर पोलीसांची करडी नजर राहील. कायदा हातात घेणार्‍यांविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी दिला. कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.