शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव शहरातून जाणारा खामगाव-पंढरपूर रस्ता रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 13:23 IST

खामगाव-पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग माजलगाव शहरातून जात आहे. रस्त्याचे शहरातील काम हे जानेवारीअखेर पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु संबंधित एजन्सीच्या हलगर्जीपणामुळे हे काम तीन महिन्यांपासून रखडले आहे.

ठळक मुद्देमाजलगाव ते केज या संपूर्ण रस्त्याचे सिमेंटीकरणाचे काम हे ८ ते ९ महिन्यांपूर्वी सुरु झालेले आहे. दरम्यान, माजलगाव शहरातील काम हे जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.

माजलगाव : खामगाव-पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग माजलगाव शहरातून जात आहे. रस्त्याचे शहरातील काम हे जानेवारीअखेर पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु संबंधित एजन्सीच्या हलगर्जीपणामुळे हे काम तीन महिन्यांपासून रखडले आहे. शहरातील रस्त्यावर खड्डे असल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

माजलगाव शहरातील संभाजी चौक ते मौलाना आझाद चौक हे अंतर दीड कि.मी.चे आहे. शहरातील हा मुख्य रस्ता असून रस्त्याच्या दुतर्फा व्यापारपेठ आहे. सदरील रस्त्यावर या अगोदर मोठया प्रमाणावर रस्ता व नालीच्या कामासाठी खर्च करण्यात आला. रस्त्याचे व नालीच्या कामाचे एकत्रित टेंडर निघालेले असताना देखील त्यावेळी संबंधित गुत्तेदाराने केवळ रस्त्याचेच काम केले ते देखील थातूरमातूर पध्दतीने व नाल्या तर केल्याच नाहीत. तेंव्हापासुन या रस्त्यावर खड्डे जागोजाग पडलेले आहेत. त्यामुळे रस्त्यावरुन रहदारी करणे धोक्याचे ठरत असून, अपघातांना निमंत्रण मिळत आहे. माजलगाव शहरातून दोन राष्ट्रीय महामार्ग गेले असून, कल्याण -विशाखापट्टणम क्र. २२२ हा बायपास मार्गे गेला आहे तर दुसरा खामगाव- पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग माजलगाव मार्गे गेला असून त्याचे प्रयोजन शहरातून केलेले आहे. माजलगाव शहराचा विकास व्हावा या हेतुने येथील आ.आर.टी. देशमुख यांनी विशेष प्रयत्न केले. खामगाव-पंढरपूर रस्त्यावरील माजलगाव ते केज या संपूर्ण रस्त्याचे सिमेंटीकरणाचे काम हे ८ ते ९ महिन्यांपूर्वी सुरु झालेले आहे. 

दरम्यान, माजलगाव शहरातील काम हे जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु अद्यापही हे काम सुरु च झालेले नाही. सदरील रस्ता हा यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता त्यानंतर तो राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरीत करण्यात आला. त्यामुळे आता रस्त्याकडे कोणीच लक्ष देण्यास तयार नाही व शहरातील काम देखील एजन्सी पूर्ण करीत नसल्यामुळे रस्त्याची अवस्था वाईट झाली आहे. 

हद्द खुणा केल्या पण अंतर किती सोडायचे ?रस्त्याचे काम होणार म्हणून हद्द खुणा देखील करण्यात आल्या. परंतु मागील आठ ते नऊ महिन्यांपासून काम सुरु  न झाल्याने नेमके काम कसे होणार आहे. तसेच हद्द खुणा केल्यापासून किती अंतर सोडायचे आहे, या बाबी स्पष्ट होत नसल्यामुळे याबाबत या रस्त्यावरील व्यापा-यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून अनेकांची बांधकामे देखील यामुळे थांबलेली आहेत. 

पुढील महिन्यात काम सुरु होईल तेलगाव-माजलगाव रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे असून, दुसरा टप्पा म्हणून माजलगाव शहराऐवजी आम्ही धारु र-केजच्या बाजुने काम सुरु  केले ते काम देखील शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे पुढील महिन्यात माजलगाव शहरातील रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरु वात करण्यात येईल. - उदय भराडे, कार्यकारी अभियंता ,रस्ते विकास महामंडळ 

टॅग्स :highwayमहामार्गroad safetyरस्ते सुरक्षाGovernmentसरकार