शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटेंकडेच शिवसंग्रामची धुरा, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड

By सोमनाथ खताळ | Updated: September 6, 2022 22:35 IST

​​​​​​​पुण्यात राज्यस्तरीय बैठकीत एकमताने नियुक्ती.

बीड : शिवसंग्रामचे संस्थापक तथा माजी आ.विनायकराव मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्रामची धुरा कोणाकडे? असा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु आता यावर पडदा पडला असून स्व.मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनीच ही धुरा सांभाळली आहे. पुण्यात मंगळवारी राज्यस्तरीय बैठक झाली. यावेळी सर्वानुमते ज्योती मेटे यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली.

विनायक मेटे हे मुंबईला जात असतानाच १४ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास त्यांच्या गाडील अपघात झाला. यात त्यांचे निधन झाले. शून्यातून पक्ष उभारून सलग पाचवेळा विधानपरिषद सदस्य मिळविले होते. मेटे यांचा राजकीय प्रवास संघर्षमय होता. परंतु त्यांच्या अचानक जाण्याने पक्ष पोरका झाला. आता यापुढे विनायक मेटे यांचे मराठा आरक्षणासह इतर स्वप्न कोण पूर्ण करणार? मुख्य म्हणजे शिवसंग्रामची धुरा कोण सांभाळणार? असा प्रश्न होता. मेटे समर्थकांकडून ज्योती मेटे यांनीच जबाबदारी घ्यावी, असा हट्ट धरला जात होता. परंतु त्या प्रशासकीय अधिकारी असल्याने काय निर्णय घेतात? याकडे लक्ष लागले होते. राज्यात सर्वत्र चर्चा होत असली तरी ज्योती मेटे यांनी याबाबत काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती.

अखेर सोमवारी पुण्यात राज्यस्तरीय बैठक झाली. यात सर्वानुमते ज्योती मेटे यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, भारतीय संग्राम परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, विक्रांत आंब्रे, राजन घाग, संदीप पाटील, उदयकुमार आहेर, शेखर पवार, तुषार काकडे, कल्याण अडागळे, समिर निकम, केतन महामुनी यांच्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाप्रमुख, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.'शेवटच्या श्वासापर्यंत शिवसंग्रामसोबतच'शिवसंग्राम स्थापनेचा मूळ उद्देश तडीस नेला जाईल. मराठा आरक्षण, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक तसेच विविध जाती -धर्मातील आरक्षण तथा उपेक्षित असणारे सर्व प्रश्न आपण संघटित होऊन यासाठी मोठा लढा उभा करून ते भविष्यात सोडवणार आहोत. तसेच शिवसंग्राम संघटनेची ही मोठी इमारत बेवारस सोडली जाणार नाही. विनायक मेटे यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसंग्राम संघटनासोबतच आहे, असे मत डॉ. ज्योती मेटे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Vinayak Meteविनायक मेटे