शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

'जस्टीस फॉर अक्षय भालेराव'; नांदेड खून प्रकरणी बीडमध्ये आंबेडकरवादी पक्ष, संघटनांची निदर्शने

By शिरीष शिंदे | Updated: June 5, 2023 18:46 IST

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शकांची घोषणाबाजी

बीड : नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून अक्षय भालेराव या भीमसैनिकाची निर्घृण हत्या करण्यात आली. सदरील घटनेचा निषेध करत या प्रकरणी सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंबेडकरी चळवळीतील सर्वपक्ष, संघटनेच्या वतीने सोमवारी निदर्शने करण्यात आली.

फुले-शाहू-आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून एका बौद्ध तरुणाची निर्घृण हत्या केली जाते ही अतिशय निंदनीय बाब आहे. त्यामुळे अक्षय भालेराव यांच्या यांच्या कुटुंबास तत्काळ पोलिस संरक्षण देण्यात यावे, त्यांच्या कुटुंबीयास ५० लाखांची आर्थिक मदत द्यावी, सदरील प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावे, गावातील सर्व बौद्ध समाजाच्या संरक्षणासाठी पोलिस चौकीची स्थापना करावी, तसेच सर्व आरोपीची मालमत्ता जप्त करण्यात यावी यासाठी बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते भीमसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

यांचा होता आंदोलनात समावेशरवी वाघमारे, आशिष कुमार चव्हाण, अजय सरवदे, अनिल तुरुकुमारे, संदीप जाधव, प्रशांत ससाने, प्रमोद शिंदे, संगीता वाघमारे, अरुणा आठवले, अनिता डोंगरे, दीपक कांबळे, धम्मपाल विद्यागर, सनी आठवले, बाळासाहेब काकडे, राजू कांबळे, नितीन सोनवणे, रजनीकांत वाघमारे, विनोद सवाई, गौतम इनकर, अशोक प्रधान, अमोल अहिरे, नितीन जोगदंड, अशोक काकडे, सिद्धार्थ जोगदंड, अशोक हुंबरे, शांतिदूत घोडके, धीरज वाघमारे, विशाल सोनवणे, आकाश वाघमारे, लखन जोगदंड, मिलिंद सरपते, विजय चांदणे, अशोक गायकवाड, संतोष जोगदंड, नितीन मुजमुले, अमोल चंदनशिव, प्रवीण टाकणखार, अमोल धनवे, भारत कांबळे, अक्षय कोकाटे, हर्षद वाघमारे, चेतन पवार, सुधीर कथले, युवराज औसरमल, श्रीकांत वाघमारे, प्रेम कांबळे हे आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :BeedबीडNandedनांदेडagitationआंदोलन