शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

फक्त परीक्षेला हजर राहा, पास आम्ही करून देऊ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 05:19 IST

संगणक टंकलेखनाचा बाजार; २० हजारांत संस्थाचालक करतात ‘मॅनेज’

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : संगणक टंकलेखनाचा संस्थाचालकांनी बाजार मांडल्याचे समोर आले आहे. २० हजार रुपये दिल्यानंतर पास करण्याची १०० टक्के गॅरंटी दिली जात आहे. तीन विषयांसाठी १४ हजार रुपये, तर ६ हजार रुपये हे केवळ प्रशासन, केंद्रप्रमुख, बैठे पथक आणि भेट देणारी यंत्रणा मॅनेज करण्यासाठी दिले जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळेच टंकलेखन परीक्षेत सर्रासपणे डमी विद्यार्थी बसविले जात असल्याचे उघड झाले. ‘लोकमत’ने हा प्रकार चव्हाट्यावर आणल्यानंतर शिक्षण विभाग खडबडून जागा झाला असून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याचा अहवाल मागविला आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत संगणक टंकलेखन परीक्षा घेतल्या जात आहेत; परंतु बीडमध्ये डमी विद्यार्थी बसवून परीक्षा दिल्या जात असल्याचे समोर आले होते. हा सर्व प्रकार ‘लोकमत’ने मंगळवारी चव्हाट्यावर आणला होता. त्यानंतर प्रशासन जागे झाले; परंतु या शिक्षणाचा सर्वत्र बाजार मांडल्याचे दिसत आहे. संस्थाचालक हे विद्यार्थ्यांकडून १५ ते २० हजार रुपये वसूल करत असल्याचे सांगण्यात येत आहे. नियमाप्रमाणे टंकलेखनासाठी नियमित उपस्थिती असणे आवश्यक आहे; परंतु हे संस्थाचालक हजेरी ‘मॅनेज’ करून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवितात. तसेच परीक्षा केंद्रातही केवळ नाव नोंद करेपर्यंतच परीक्षार्थी बसविले जातात. त्यानंतर दुसऱ्याच मिनिटाला मूळ परीक्षार्थीला बाजूला करून डमी परीक्षार्थी बसविले जात आहेत. यामध्ये लाखो रुपयांची उलाढालही होत आहे.

अशी आकारली जाते फी?मराठी ३०, इंग्रजी ३०-४० अशा तीन विषयांसाठी प्रतिमहिना, प्रतिविषय ७०० रुपये शुल्क संस्थाचालक आकारतात. त्याप्रमाणे सहा महिन्यांच्या एका विषयासाठी ४ हजार ७०० रुपये घेतले जातात. यात परीक्षा शुल्क हे केवळ ५०० रुपये असते. हे शुल्क नियमित सराव करणाऱ्यांसाठी आहे, तर केवळ परीक्षांसाठी येणाऱ्यांकडून प्रति विषय २ हजार रुपये जास्तीचे घेतले जातात. यामध्ये १ हजार रुपये संस्थाचालकाचे आणि १ हजार रुपये बाकी प्रशासकीय यंत्रणा मॅनेज करण्यासाठी वाटप केले जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

स्पॉट व्हिजिट करून वस्तुनिष्ठ चौकशी करून सर्व अहवाल सादर करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिलेले आहेत. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.- अजित पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.