माजलगाव : उद्योगासाठी मोठ्या प्रमाणात संधी असताना देखील युवा वर्ग हा उद्योगाकडे वळताना अडखळतो; परंतु सर्व अडथळ्यांवर मात करून येथील जयमहेश उद्योग समूहाने वाहन व्यवसायात नवीन संधी आणि रोजगार निर्मितीत मोठी भरारी घेतली आहे. ऑनलाइन वाहन खरेदी-विक्री कक्ष उभारून २७ डिसेंबर रोजी समूह आपला वर्धापन दिन साजरा करणार असल्याचे समूहाचे अध्यक्ष शिवप्रसाद भुतडा यांनी सांगितले.
जयमहेश उद्योग समूहाने उद्योगासोबतच नेहमी सामाजिक दायित्वदेखील जपलेले आहे. मागील वर्षी सामूहिक विवाह सोहळ्यात २० हजार वऱ्हाडी मंडळींना अन्नदानासह विविध सामाजिक दायित्व पार पाडले. या उद्योगाच्या माध्यमातून तालुक्यातील सुमारे ५०० तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. वाहनधारकांच्या असलेल्या वाहनविषयक अडचणी लक्षात घेऊन त्या दूर करण्यासाठी समूहाने एकाच छताखाली मोठी यंत्रणा उभारली. पुणे, मुंबई, औरंगाबाद येथे जाऊनही दूर न होणारी समस्या आज जयमहेश आपल्या समूहाच्या माध्यमातून दूर करू लागल्यामुळे समाधानी ग्राहकांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समूहाचा वर्धापन दिनदेखील साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असून, ऑनलाइन वाहन खरेदी-विक्रीच्या विस्तारित कक्षाचे उद्घाटन छत्रपती कारखान्याचे व्हा. चेअरमन मोहनराव जगताप यांच्या हस्ते २७ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती समूहाचे अध्यक्ष शिवप्रसाद भुतडा यांनी दिली आहे.
...................(वाणिज्य वार्ता)