शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

केज तालुक्यातील जवान उमेश मिसाळ राजस्थानमध्ये शहीद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 19:52 IST

बुधवारी सकाळी 9 वाजता कोल्हेवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

केज : तालुक्यातील कोल्हेवाडी येथील जवान उमेश नरसू मिसाळ हे राजस्थानमधील सुरतगढ येथे परेडला जाताना भूमिगत वीज वाहिनीचा धक्का लागून सोमवारी सकाळी शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी 9 वाजता कोल्हेवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

केज तालुक्यातील उमेश नरसू मिसाळ ( 22) हे 2 वर्षांपूर्वी 25 मराठा बटालियनमध्ये सैनिक म्हणून भरती झाले होते. उमेश मिसाळ यांचे आई, वडील हे ऊसतोड कामगार आहेत. 6 महिन्यापूर्वी केकाणवाडी येथील प्रतीक्षा केकाण यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. 15 दिवसांपूर्वीच ते पुतणीच्या लग्नासाठी गावी आले होते. परंतु पुतणीच्या हळदीच्या दिवशीच त्यांना मराठा बटालियनमध्ये तातडीने परत येण्याचे आदेश आले. यामुळे पुतणीचे लग्न सोडून ते  देशसेवेसाठी सुरतगढ, राजस्थानकडे रवाना झाले. 

दरम्यान, सोमवारी सकाळी ते परेडसाठी जात असताना भूमिगत विजवाहिनीतून त्यांना धक्का बसून ते सेवारत असतानाच शहीद झाले. ही वार्ता गावात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्च्यात आई, वडील, पत्नी आणि 2 भाऊ असा परिवार आहे. उमेश मिसाळ यांचे पार्थिव कोल्हेवाडी येथे बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत  पोहचणार असून 9 वाजण्याच्या दरम्यान शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार  होणार असल्याची माहिती तहसीलदार एम. जी. खंडागळे यांनी दिली.

माजी सैनिक संघटनेचे आवाहन...सुभेदार सुधाकर कुटाळ व त्यांचे सहकारी शहीद उमेश मिसाळ यांचे पार्थिव दिल्ली येथून विमानाने पुणे येथे घेऊन येणार आहेत. उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत त्यांच्या मूळ गावी कोल्हेवाडी येथे पार्थिव पोहचेल. शहीद भूमीपुत्रास अंतिम निरोप देण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन केज तालुका संघर्ष माजी सैनिक संघटनेच्यावतीने अध्यक्ष अजिमोद्दीन शेख, सचिव प्रा हनुमंत भोसले व सर्व माजी सैनिकांनी केले आहे.

टॅग्स :MartyrशहीदBeedबीडIndian Armyभारतीय जवान