शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेणाऱ्या सहायक फौजदाराला सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 15:25 IST

धानोरा येथील एका चहाच्या टपरीवर ४ हजारांची लाच स्वीकारताना ढोले याला रंगेहाथ पकडले.

बीड  : पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्रकरणात पत्नी व मुलांची नावे वगळण्यासाठी आणि कारवाई टाळण्यासाठी आपल्याच ठाण्यात कार्यरत बीट अंमलदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक विलास ढोले याला एक वर्ष सक्त मजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा येथील प्रमुख सत्र न्यायाधीश अंजू शेंडे  यांच्या न्यायालयाने सुनावली. 

अंभोरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कैलास भाऊराव थोरवे यांच्यासह पत्नी व मुलावर एन.सी. दाखल झाली होती. या प्रकरणात पत्नी आणि मुलांची नावे वगळण्यासाठी तसेच प्रतिबंधक कारवाई टाळण्यासाठी याच पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक विलास ढोले याने ५ हजार रुपयांची लाच मागितली. सदर लाच देण्याची मानसिकता नसल्याने या प्रकरणी कैलास थोरवे यांनी बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात १० आॅक्टोबर २०१२ मध्ये तक्रार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने लाचेची पडताळणी करून आष्टी तालुक्यातील धानोरा बस स्टॉपवर ११ आॅक्टोबर २०१२ रोजी सापळा रचला.

धानोरा येथील एका चहाच्या टपरीवर ४ हजारांची लाच स्वीकारताना ढोले याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन दोषारोपपत्र बीड येथील प्रमुख सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. न्यायालयाने या प्रकरणी तत्कालीन पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांची मंजुरी घेऊन पंच सचिन जोगदंड, तक्रारदार कैलास थोरवे, तपासी अधिकारी सुरेश चाटे यांच्या साक्षी नोंदविल्या. या साक्षी पुराव्यावरून आरोपी विलास ढोले यास दोषी धरून एक वर्षे सक्तमजूरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणBeedबीडjailतुरुंग