शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

जगद्गुरू शंकराचार्यांच्या स्वागताची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 01:04 IST

दक्षिणाम्नाय शारदापीठ श्रृंगेरी पीठ (कर्नाटक) येथील जगद्गुरू शंकराचार्य श्रीविधुशेखर भारती स्वामीजी भारत विजयी यात्रेनिमित्त २, ३ व ४ फेब्रुवारीदरम्यान बीड शहरात वास्तव्यास असणार असून या तीन दिवसात शोभायात्रेसह विविध कार्यक्र मांचे आयोजन केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दक्षिणाम्नाय शारदापीठ श्रृंगेरी पीठ (कर्नाटक) येथील जगद्गुरू शंकराचार्य श्रीविधुशेखर भारती स्वामीजी भारत विजयी यात्रेनिमित्त २, ३ व ४ फेब्रुवारीदरम्यान बीड शहरात वास्तव्यास असणार असून या तीन दिवसात शोभायात्रेसह विविध कार्यक्र मांचे आयोजन केले आहे.सर्व धर्म समभावाचा संदेश घेऊन स्वामीजी भारत विजयी यात्रेवर निघाले आहेत. २ फेब्रुवारी रोजी शोभायात्रा काढून जगद्गुरूंचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती संयोजन समितीचे अ‍ॅड. कालीदास थिगळे, वे.शा.सं.धुंडीराज शास्त्री पाटांगणकर, ह.भ.प.भरतबुवा रामदासी, ज्येष्ठ संपादक नामदेवराव क्षीरसागर यांनी दिली.श्री क्षेत्र जनीजनार्दन संस्थान येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जगद्गुरू शंकराचार्य यांचे २ फेब्रुवारी रोजी आगमन होताच सायंकाळी ६ वाजता त्यांची शोभायात्रा बलभीम चौक ते सर्वेश्वर मंदिरापर्यंत निघणार आहे.त्यानंतर आचार्यश्रींचे संक्षिप्त आशिर्वचन लाभणार आहे. रात्री ८.३० वाजता शहरातील औटी मंगल कार्यालय येथे श्रीचंद्रमौलीश्वर परमेश्वर पूजा होईल.रविवार, दि.३ फेब्रुवारी रोजी जगद्गुरु शंकराचार्यांचे प्रत्यक्ष दर्शन, पाद्यपूजा होणार आहे. दुपारी ४ ते ६ या वेळेत अभंगवाणी कार्यक्रम विठ्ठलसाई प्रतिष्ठान येथे होणार असून, तेथेच सायंकाळी ६.३० वाजता गुरु वंदना कार्यक्रम व जगद्गुरूंचे आशीर्वचन होणार आहे.सोमवार दि. ४ फेब्रुवारी रोजी आचार्यश्रींचे प्रत्यक्ष दर्शन व पाद्यपूजा सकाळी १० वाजता हाईल. त्यानंतर त्यांचे बीड येथून शुभप्रस्थान होईल. या सर्वक्रमाच्या नियोजनासाठी विविध समित्या स्थापन केल्या आहेत. आचार्यश्रींचे दर्शन व आशीर्वचन सर्व जाती, धर्म, पंथ यांच्यासाठी खुले असणार आहे. शोभायात्रेसह सर्व कार्यक्रमांमध्ये जाती, धर्म, पंथांच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच आचार्यश्रींच्या भारत विजयी यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन श्रुतीगंध वेद पाठशाळा आणि जगद्गुरू शंकराचार्य विजयी यात्रा स्वागत समितीने केले आहे. यावेळी दिलीप खिस्ती, प्रमोद पुसरेकर, विनायक पाटांगणकर, संजय गुळजकर आदींसह इतरांची उपस्थिती होती.जगद्गुरू शंकराचार्यांच्या स्वागतासाठी काढण्यात येणारी शोभायात्रा मुख्य आकर्षण ठरणार आहे. शहरातील ब्रह्मयोगिनी, ब्रह्मतेज, आदिशक्ती महिला मंडळाच्या वतीने या शोभायात्रेमध्ये विविध वेशभूषा, विष्णू दशावतार साकारले जाणार आहेत. शोभायात्रेत महिलांसह पुरु ष, युवक, युवती मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमSocialसामाजिक