शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

व्हायरल झालाय चांगला... आमच्या पप्पांनी गंपती आणला म्हणणारा साईराज

By सोमनाथ खताळ | Updated: September 10, 2023 08:51 IST

सोशल मीडियाने अनेकांना हीरो केले, त्यात बीड जिल्ह्यातील परळीचा चार वर्षांचा साईराज हादेखील एक आहे. 

सोमनाथ खताळ

सध्या साेशल मीडियावर ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला...’ हे गाणे प्रचंड व्हायरल होत आहे. हे गाणे गाणारी चिमुकली भावंडे ठाणे जिल्ह्यातील असली तरी त्यावर अभिनय करून याला चर्चेत आणणारा चिमुकला बीड जिल्ह्यातील आहे. सध्या त्याने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियाने अनेकांना हीरो केले, त्यात बीड जिल्ह्यातील परळीचा चार वर्षांचा साईराज हादेखील एक आहे. 

‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणे मनोज घोरपडे (मु. चरली वडा, पो. राहनाळ, ता. भिवंडी, जि. ठाणे) यांनी लिहिले. भिवंडीत वडापावचा गाडा लावून ते आपला उदरनिर्वाह भागवतात. २०२२ मध्ये त्यांनी गाडा चालवत असतानाच ‘ गरबा नाचायला आली मम्मीच्या संगे ’ हे गाणे लिहिले. ते गाण्यासाठी मोठ्या सेलिब्रिटींऐवजी आपलीच चार वर्षांची शौर्या आणि ७ वर्षांच्या माउलीला पुढे केले. त्यांना गायनाची एक तालीम करून दाखवली आणि या चिमुकल्या भावंडांनी ते गाऊन वडिलांचा विश्वास सार्थ ठरवला. त्यानंतर २०२२ सालीच गणेशोत्सवाच्या वेळी ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला..’ हे गाणे लिहिले. शौर्या आणि माउली घोरपडे यांनी ते गायले. परंतु, वर्षभर त्याची फारशी प्रसिद्धी झाली नाही. आता अचानक हे गाणे प्रत्येकाच्या ओठांवर रुळले आहे. चिमुकल्यांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच या गाण्याने वेड लावले आहे. त्याला कारण ठरलाय केंद्रेवाडी (ता. परळी, जि. बीड) येथील साईराज केंद्रे हा अवघ्या चार वर्षांचा चिमुकला. शाळेच्या गणवेशात त्याने या गाण्यावर केलेला अभिनय सध्या प्रत्येकाच्या मनात बसला आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप या सर्व ठिकाणी त्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. राज्यभरात साईराजच्या अभिनयाने लोकांना भुरळ घातली आहे. तो सध्या सर्वत्र फेमस झाला आहे. 

‘टिकटॉक’वर पहिले गाणेसाईराजने अवघा दीड वर्षाचा असताना ‘ए आई, मला पावसात जाऊ दे’ या गाण्यावर ‘टिकटॉक’वर पहिला व्हिडीओ बनवला. त्यानंतर आता शाळेत जाताना यूट्यूबवर ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणे पाहिले. त्यावर व्हिडीओ बनवण्याचा हट्ट त्याने वडील गणेश केंद्रे यांच्याकडे धरला. एके दिवशी शाळेत जातानाच गणेश केंद्रे यांनी त्याचा हा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर टाकला अन् बघता बघता त्याने राज्यभरात धुमाकूळ घातला. तो अभिनयासोबतच अभ्यासातही प्रचंड हुशार असल्याचे वडील गणेश केंद्रे सांगतात. ज्यांनी गाणे गायले त्यांचा आणखी संपर्क झाला नाही. परंतु, माझ्या मुलाला मिळत असलेली प्रसिद्धी पाहून मनस्वी आनंद होत आहे, असेही गणेश केंद्रे सांगतात. 

गणपती येणार आमच्या घराला...

शौर्या व माउली या चिमुकल्यांनी आपल्या गोड आवाजाने लोकांची मने जिंकली आहेत. साईराज जरी फेमस झाला असला तरी पडद्यामागे असलेल्या चिमुकल्या भावंडांनाही त्याचे काही श्रेय जाते. या भावंडांची पहिली दोन गाणी हिट झाल्यानंतर आता ‘गणपती येणार आमच्या घराला, १० दिवसांची मजा...’ हे गाणे त्यांनी गायले आहे. तेदेखील लाडक्या गणरायाची प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वीच रिलीज करणार असल्याचे मनोज घोरपडे यांनी सांगितले. मुलांना गायनाची खूप आवड आहे. परंतु, परिस्थिती आडवी येते. अशातही मी आणि माझी मुले आमचा छंद जोपासतो. आमच्या मुलांच्या गाण्यावर दुसरे कोणी फेमस होत असेल, तर याला मी काय करणार ? कोणाला फेमस करायचे हे सोशल मीडिया आणि नागरिकांच्या हातात आहे, अशी प्रतिक्रिया मनोज घोरपडे यांनी दिली.

लेखक उपसंपादक, बीड  

 

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाganpatiगणपतीBeedबीड