शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

उपवासाला साबुदाणा न खाल्लेलाच बरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:37 IST

बीड : श्रावण महिना सुरू झाला आहे. त्यामुळे उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढते. परिणामी भगर आणि साबुदाण्याचे दर वाढले आहेत. ...

बीड : श्रावण महिना सुरू झाला आहे. त्यामुळे उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढते. परिणामी भगर आणि साबुदाण्याचे दर वाढले आहेत. उपवासात एनर्जी देणारे पदार्थ चवीला आणि आरोग्याच्या दृष्टीने चांगले मानले जाते. साबुदाणा खाल्ल्याने पेशींची वाढ होते. वजनवाढीसाठी उपयुक्त, हाडे मजबूत होतात. अशक्तपणा कमी होतो. यात सायनाइडचे प्रमाण कमी असलेतरी जास्त खाल्ल्याने विविध आजारांचा धोका उद्‌भवण्याची शक्यता असते. त्यामुळे उपवासात अनेक जण प्रमाणात सेवन करतात, तर साबुदाणा वर्ज्य करून अन्य पदार्थ खाण्याकडे अनेक लाेक वळत आहेत.

उपवासाच्या पदार्थांचे दर (प्रति किलो)

१० जुलै १० ऑगस्ट

भगर ११५ १२५

साबुदाणा ५५ ६०

नायलॉन साबुदाणा ७५ ८०

२) दर का वाढले?

नाशिक जिल्हा व घोटी परिसरात यंदा पीक कमी असल्याने भगरचे उत्पादन कमी झाले आहे. तर, तामिळनाडूच्या सेलम भागातही साबुकंद पीक कमी आहे. यातच वाहतूक दर वाढल्याने भाव काहीसे वधारले आहेत. जुलैच्या तुलनेत भगरीच्या दरात किलोमागे १० रुपयांची वाढ झाली आहे. साबुदाणादेखील किलोमागे ५ रुपयांनी वधारला आहे. मात्र, भाव स्थिरच असल्याचे सांगण्यात येते.

३) साबुदाणा आरोग्याला हानिकारक

जास्त साबुदाणा खाण्याचे परिणाम घातक आहेत. साबुदाण्यात कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे मधुमेहाची पातळी वाढते. साबुदाणा खाण्याआधी मधुमेहींनी डॉक्टरी सल्ला घेणे महत्त्वाचे. जास्त साबुदाणा खाल्ल्याने स्थूलपणा आणि वजन वाढू शकते. त्यामुळे अधिक सेवन मेंदू, हृदय, कोमा, श्वास घेण्यात अडथळा, छाती दुखणे, रक्तविकार, डोकेदुखी, थायरॉइड असे आजार बळावू शकतात. विशेषत: कॅन्सरला आमंत्रण ठरू शकते, असे विविध तज्ज्ञांचे मत आहे.

४) उपवास आहे, मग हे पदार्थ खा !

उपवासाच्या दिवशी जास्तीत जास्त फळांचे सेवन करणे चांगले. फळांमध्ये प्रोटीन आणि पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने थकवा न येता पाणीप्रमाण कमी होणार नाही. गूळ, शेंगदाण्याची चिक्की, राजगिरा लाडू खाल्ल्याने थकवा जाणवत नाही, ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राहते. नारळ पाण्याच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात.

- मितेश गवते, आहारतज्ज्ञ बीड.