केळसांगवी ग्रामपंचायतींतर्गत सिव्हिल इंजिनिअर विजय बोराटे यांनी स्मार्ट सिटी योजनेतील ई-निविदा भरण्यासाठी आवश्यक अट क्रमांक ५ मधील ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र मिळावे, अशी मागणी केली होती. मात्र, त्यांना सदर प्रमाणपत्र जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याने संबंधितांवर कारवाई करावी, तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य हर्षल घुले, उषा बोराडे, चंदाबाई पवार यांनी त्यांना विश्वासात न घेता कामे होत असल्याने ग्रामसभांच्या प्रोसिडिंग व नोंदवह्यांच्या सत्यप्रती, जमाखर्च, ताळेबंद नोंदवह्या, तसेच १४ व्या वित्त आयोगातून झालेल्या कामांचा तपशील, निविदा प्रक्रियेचा तपशील देण्याबाबत विनंती केली होती. मात्र, अद्याप ही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे केळसांगवी ग्रामपंचायतींतर्गत झालेल्या अनियमिततेप्रकरणी दोषींवर कारवाई होण्यासाठी पंचायत समिती कार्यालयासमोर अजित घुले, विजय बोराडे, हर्षल घुले, किशोर घुले, संदीप घुले, सतीश घुले, चांदखा पठाण, दादा गायकवाड, गोवर्धन घुले, बाप्पू घुले, राहुल घुले, भरत घुले, मनोहर घुले, महेश बोराडे, महादेव बोराडे, महादेव बोराडे, राजेंद्र बोराडे, दत्ता पडोळे आदी उपोषणाला बसले होते. सभापती बद्रीनाथ जगताप, सहायक गटविकास अधिकारी प्रभाकर अनंत्रे यांच्या लेखी आश्वासनानंतर दुपारी उपोषण मागे घेण्यात आले आहे.
केळसांगवी ग्रामपंचायतीत अनियमितता, कारवाईसाठी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:22 IST