शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक खर्चाची पुन्हा चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 23:31 IST

जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या आदेशानुसार चौकशी समिती नेमली होती.

ठळक मुद्देबीड लोकसभा मतदारसंघ : तक्रार अर्ज वाढले

बीड : जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या आदेशानुसार चौकशी समिती नेमली होती. या समितीने गत महिन्यात चौकशी केली होती. दरम्यान तक्रारी वाढल्याने पुन्हा चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार ६ सदस्यीय समिती ५ मार्च रोजी येथे दाखल झाली असून ६ मार्च रोजीही चौकशी करणार आहे.लोकसभा आणि विधानसभा निवडणूक खर्चाच्या संदर्भात विभागीय आयुक्तांकडे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार विभागीय स्तरावरून हिंगोलीचे अपर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, राजीव नंदकर, सहाय्यक संचालक लेखा सचिन धस, नायब तहसीलदार चेतन पाटील, सहा.लेखाअधिकारी तारो या ६ जणांची समिती गठित करून चौकशी केली. दरम्यान चौकशी पूर्ण करून त्यांनी विभागीय आयुक्तांकडे अहवाल सादर केला होता. मात्र, चौकशी झाल्यानंतर देखील तक्रारदारांनी असामाधन व्यक्त केले. समिती सदस्यांवर हातमिळवणीचे आरोप केले होते. याच दरम्यान एका अधिकाऱ्याने निनावी निवडणूक खर्चासंदर्भात तक्रार केल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी पुन्हा पारदर्शक व स्वतंत्रपणे चौकशी करून १७ मार्चपर्यंत अहवाल देण्याचे आदेश समितीला दिले आहेत. त्यामुळे चौकशी समितीच्या अहवालानंतरच निवडणूक खर्चाच्या तक्रार व आरोपावर पडदा पडणार आहे.स्वतंत्रपणे झाली चौकशीजिल्हाधिकारी कार्यालयात ५ मार्च रोजी सर्व निवडणूक प्रक्रियेशी संबंधित उपविभागीय अधिकारी तहसीलदार तसेच कंत्राटदार व तक्रारदारांची स्वतंत्रपणे चौकशी केली आहे. ६ मार्च रोजी कंत्राटदार व तक्रारदारांची पुन्हा चौकशी होणार आहे.

टॅग्स :BeedबीडElectionनिवडणूकBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीड