शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी तालुक्यात अवैध वृक्षतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:13 IST

एकीकडे वृक्षलागवड करून ती जगविण्यासाठी धडपड करणारे नागरिक, तर दुसरीकडे लाकूड तस्करांकडून स्वयंचलित मशीनद्वारे ट्रक व ट्रॅक्टरद्वारे होणारी वृक्षतोड असे परस्परविरोधी चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देनियमांची पायमल्ली : अधिकारी-लाकूड तस्करांचे संगनमत; चौकशीची मागणी

कडा: एकीकडे वृक्षलागवड करून ती जगविण्यासाठी धडपड करणारे नागरिक, तर दुसरीकडे लाकूड तस्करांकडून स्वयंचलित मशीनद्वारे ट्रक व ट्रॅक्टरद्वारे होणारी वृक्षतोड असे परस्परविरोधी चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे. अवैधरीत्या तोडण्यात आलेल्या झाडांची कत्तल करून त्याच्या फळ्या व चौकोनी तुकडे करून आरा गिरण्यांमार्फत मुंबई, पुणे यासारख्या शहरांत पाठवून मोठ्या प्रमाणावर पैसे कमविण्याचा उद्योग सुरू आहे.आष्टी पोलिसांनी सोमवारी रात्री मिळालेल्या माहितीनुसार आयटीआय महाविद्यालयाजवळ शिंदेवाडी फाट्यानजीक वेताळवाडी, किन्ही भागांत लिंबाच्या मोठमोठ्या लिंबाच्या झाडांची कत्तल करून लाकडांनी गच्च भरलेला ट्रॅक्टर (क्र. एमएच-२३, क्यू-१५९४) आरा गिरणीकडे जात असताना पकडला. पोलीस निरीक्षक माधव सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सोमनाथ गायकवाड, अजित सिकेतोड, सचिन कोळेकर या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. यामुळे वनविभागाचे व लाकूड तस्करांशी असलेले कनेक्शन उघड झाले आहे.दत्ता काकडे यांचा इशारा : तक्रार करणारआष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होत असून, येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे सॉ मिल धारक आणि लाकडांच्या व्यापाऱ्यांशी संबंध असून, जर कुणी अवैध लाकूडतोडीची माहिती वनविभागाला देऊनही कारवाई होत नाही. याउलट सॉ मिलधारकांना याबद्दल माहिती देऊन ही लाकडे परस्पर दुसरीकडे घेऊन जाण्याबाबत सांगण्यात येते.२५ मार्च रोजी सायंकाळी साडेआठ वाजता वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे यांना माहिती देऊनही लाकूड भरून आलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यापेक्षा काकडे यांनी त्यांचा फोन बंद करून ठेवला. यानंतर आष्टी पोलिसांनी सदर ट्रॅक्टर ताब्यात घेतला असून त्यावर आता कारवाई सुरू आहे.निष्क्रि य वनपरिक्षेत्र अधिकारी काकडे यांच्याविरुद्ध विभागीय आयुक्त व वन विभागाच्या सचिवांकडे तक्रार करणार असल्याचे जलनायक दत्ता काकडे यांनी सांगितले.

टॅग्स :Beedबीडenvironmentवातावरण