शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाई येथील खडी केंद्रातील खोदकामाची तपासणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 19:24 IST

खडी केंद्र चालकांनी  अवैधरित्या खोदकाम  केलेल्या खदाणीची तपासणी भूमी अभिलेख व महसूल प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. नियमानुसार खोदकाम केले नसेल तर या खडी केंद्रांना नव्या नियमानुसार पाचपट दंड ठोठावण्यात येणार आहे. 

अंबाजोगाई ( बीड ): तालुक्यातील खडी केंद्र चालकांनी  अवैधरित्या खोदकाम  केलेल्या खदाणीची तपासणी भूमी अभिलेख व महसूल प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. नियमानुसार खोदकाम केले नसेल तर या खडी केंद्रांना नव्या नियमानुसार पाचपट दंड ठोठावण्यात येणार आहे. 

परवाना मुदतीनंतर नुतनीकरणाबाबत तहसीलदार संतोष रूईकर यांनी खडी केंद्र चालकांना नोटीस बजावल्यानंतरही  परवाने नुतनीकरण केले नाही. त्यामुळे तालुक्यातील खडीकेंद्र सील केले होते. या कारवाईनंतर  संबंधित खडी केंद्रांनी किती खोदकाम केले,  खडी तयार करण्यासाठी दगड वापरले आहेत काय याची मोजणी करून दंड आकारण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे, उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार यांनी भूमीअभिलेख कार्यालयास पत्र देऊन खदाणीच्या खोदकामाचे मोजमाप करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार भूमिअभिलेख व महसूल प्रशासनाने तालुक्यात असलेल्या खडी केंद्रांनी केलेल्या खोदकामांची तपासणी केली जात आहे.

तालुक्यातील पोखरी, घाटनांदूर, पिंपळा धायगुडा येथील खडी केंद्रांनी केलेल्या खोदकामाची आतापर्यंत तपासणी करण्यात आली आहे.  ही तपासणी इतर खडी केंदांची  तपासणी सुरु आहे. खडी केंद्रानी केलेले खोदकाम नियमानुसार झाले आहे की नाही हे भूमी अभिलेख कार्यालयाच्या तपासणीतून व या विभागाने दिलेल्या अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. नियमबाह्य खोदकाम झाल्यानंतर या खडी केंद्रांकडून दंड वसूल करण्यात येणार असल्याने खडी केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहेत. 

किती खोदकाम केले हे पाहून दंड वसुलीखडी केंद्राने केलेल्या खोदकामाची तपासणी भूमीलेख अभिलेख व महसूल प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. किती खोदकाम केले आहे. याचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांना पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येईल, असे तहसीलदार संतोष रूईकर म्हणाले.

टॅग्स :Beedबीड