शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

तपासणी मोफत, पण औषधी विकत; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला बीड जिल्हा रुग्णालयात केराची टोपली

By सोमनाथ खताळ | Updated: February 12, 2024 14:24 IST

जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी करून चिठ्ठीवर लिहून दिलेल्या गोळ्या घेण्यासाठी औषधी भांडारमध्ये गेल्यावर मोजक्याच गोळ्या हातावर टेकवल्या जात आहेत.

बीड : १५ ऑगस्ट २०२३ पासून राज्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये सर्व तपासण्या व औषणधी मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. परंतू जिल्हा रूग्णालयात सुरूवातीपासूनच औषधींचा तुटवडा आहे. सोमवारीही माहिती घेतली असता तपासणी मोफत केली जात आहे, परंतू औषधींसाठी खासगी मेडिकल्सचा रूग्णांना आधार घ्यावा लागत आहे. यात रूग्णांची आर्थिक लुट होत आहे. या प्रकाराने संताप व्यक्त होत असून मुख्यमंत्र्यांच्या मोफत सुविधेची घोषणा सध्या तरी हवेतच असल्याचे दिसत आहे.

जिल्हा रूग्णालयातील औषधांचा मागील आठवड्यातच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक बडे यांनी आढावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी सर्व विभागप्रमुख, वॉर्ड इन्चार्ज यांची बैठकही घेतली. जे औषधी उपलब्ध आहेत, तेच रूग्णांना लिहून द्या, अशा स्पष्ट सुचना डॉ.बडे यांनी डॉक्टरांना दिल्या होत्या. परंतू या सुचनांचे कोणीही पालन करत नसल्याचे सोमवारी दिसून आले. जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी करून चिठ्ठीवर लिहून दिलेल्या गोळ्या घेण्यासाठी औषधी भांडारमध्ये गेल्यावर मोजक्याच गोळ्या हातावर टेकवल्या जात आहेत. इतर गोळ्या बाहेरून घ्या, असा सल्ला फार्मासिस्टकडून दिला जात आहे. या प्रकाराने मात्र, सामान्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. याची चौकशी करावी, अशी मागणी रूग्णांमधून होत आहे.

रूग्ण काय म्हणतात...माझा भाचा बीडमध्ये हाॅस्टेलवर आहे. त्याची तपासणी करूना त्याला चार गोळ्या व एक बॉटल लिहून दिली. एक बाॅटल आणि दोन गोळ्या दिल्या, पण दोन दिल्याच नाहीत. बाहेरून घ्या, असे तेथील फार्मासिस्टने सांगितले. माझ्यासाररखेच इतरांनाही सांगत होते. आमची परिस्थिती गरीब असल्यानेच आम्ही सरकारी रूग्णालयातील मोफत सुविधेचा लाभ घेण्यासाठी आलो होतो. पण येथे औषधी बाहेरून घ्या, असे सांगतात, असे पांडूरंग शिंदे यांनी सांगितले. अशाच संतप्त प्रतिक्रिया इतरांनीही व्यक्त केल्या.

आरोग्य मंत्री नॉट रिचेबल, विरोधक आक्रमकया प्रकरणात आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंंत यांना संपर्क साधला. परंतू त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते म्हणाले, ही गंभीर बाब आहे. यावर आम्ही आवाज उठवू. उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, असे असेल तर चुक आहे, मी लगेच माहिती घेते. असे सांगितले.

सीएसने दखल घेतली, पण...यापूर्वीही अशाच तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक बडे यांनी दखल घेत तात्काळ बैठक घेत पत्र काढले. त्यानंतर सोमवारीही माहिती झाल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठवून खात्री केली. यावेळी मोजक्याच औषधी या भांडार विभागातून दिल्या जात असल्याचे पहावयास मिळाले. त्यावरून जिल्हा शल्य चिकित्सकांच्या पत्राचा आणि बैठकीला डॉक्टरांनी गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसत आहे. डॉ.बडे यांना थोडं आक्रमक होऊन अशाप्रकारे रूग्णांना बाहेर पाठविणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची गरज आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीयBeedबीडhospitalहॉस्पिटल