शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धारुर पोलीस ठाण्यातून पळालेला अट्टल गुन्हेगार कोल्हापूरमध्ये जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 00:33 IST

बीड : लुटारू टोळीचा म्होरक्या कुख्यात विलास बडे हा धारूर पोलीस ठाण्यातून ११ महिन्यांपूर्वी पळून गेला होता. त्याला कोल्हापूर पोलिसांनी पकडले आहे. बीड पोलिसांनी विलासचे लोकेशन आणि इतर माहिती पुरविल्याने कोल्हापूर पोलिसांना ही कारवाई करणे सोपे झाले. विलास हा बीडसह राज्यातील ११ जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातील ४ जिल्ह्यात ‘मोस्ट वॉन्टेड’ होता. ...

बीड : लुटारू टोळीचा म्होरक्या कुख्यात विलास बडे हा धारूर पोलीस ठाण्यातून ११ महिन्यांपूर्वी पळून गेला होता. त्याला कोल्हापूर पोलिसांनी पकडले आहे. बीड पोलिसांनी विलासचे लोकेशन आणि इतर माहिती पुरविल्याने कोल्हापूर पोलिसांना ही कारवाई करणे सोपे झाले. विलास हा बीडसह राज्यातील ११ जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातील ४ जिल्ह्यात ‘मोस्ट वॉन्टेड’ होता. त्याला दोन दिवसांनी पुन्हा विविध गुन्ह्यांत बीडला आणले जाणार आहे.

विलास बडे, गणेश बडे या भावंडांसह बाळू पवार यांची टोळी आहे. या टोळीने बीड जिल्ह्यासह पुणे ग्रामीण, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, लातूर, नांदेड, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा या ११ जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घातला. एवढ्यावरच न थांबता या टोळीने कर्नाटकातील चार जिल्ह्यांमध्येही गुन्हे केले होते. त्यानंतर त्याला पुणे पोलिसांनी पकडून त्याच्यावर ‘मोका’ची कारवाई केली. तो कारागृहात होता.

त्यानंतर बीड पोलिसांनी त्याला धारूरच्या गुन्ह्यात बीडला आणले. काही तास राहिल्यानंतर पोलिसांची नजर चुकवून त्याने ठाण्यातून पलायन केले होते. बीड पोलिसांसह राज्यातील पोलीस त्याचा शोध घेत होती. परंतु त्यावेळेस तो मिळाला नाही.

त्यानंतरही बीड पोलिसांकडून त्याची माहिती घेतली जात होती. कोल्हापूर जिल्ह्यात तो असल्याची माहिती मिळताच तेथील पोलिसांनी बीडमधून माहिती मागविली. त्याची ‘हिस्ट्री’ पाठविल्यानंतर तात्काळ त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला आता पुन्हा बीड जिल्ह्यात दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांमध्ये बीडमध्ये आणले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.पुण्यानंतर बीडमध्ये मोकाविलासवर पुणे पोलिसांनी ‘मोका’ची कारवाई केलेली आहे. त्यातच तो पुणे कारागृहात होता. त्यानंतर त्याला बीडला आणले. येथेही बीड पोलिसांनी त्याच्यासह पूर्ण टोळीवर मोकाची कारवाई केली होती.

टॅग्स :BeedबीडArrestअटकMarathwadaमराठवाडा