शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

शिक्षक बदल्यांचे गु-हाळ सुरूच, ५४३९ बदलीपात्र शिक्षक मात्र २११ शिक्षकांचे अर्ज आलेच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 11:58 IST

२३ आॅक्टोबरपर्यंत आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पोर्टल कोलमडल्याने पूर्ण होऊ शकली नाही. यातच २११ बदलीपात्र शिक्षकांनी अद्याप आॅनलाईन अर्ज भरले नसून ५१ शिक्षकांचे अर्ज व्हेरीफाय झाले नसल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात ५ हजार ४३९ शिक्षक बदली पात्र ठरले आहेत.यातील २११ शिक्षकांनी अर्ज भरलेच नाहीत तर इतर ५१ शिक्षकांच्या अर्जाची पडताळणी झाली नाही.

बीड : शासनाने २७ फेब्रुवारीच्या निर्णयानुसार शिक्षक बदल्यांची प्रक्रिया राबवावी असा निर्णय घेतल्यानंतर यातील पध्दतीला विरोध दर्शवित शिक्षक संघटना रोष व्यक्त करत आहेत. २३ आॅक्टोबरपर्यंत आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पोर्टल कोलमडल्याने पूर्ण होऊ शकली नाही. यातच २११ बदलीपात्र शिक्षकांनी अद्याप आॅनलाईन अर्ज भरले नसून ५१ शिक्षकांचे अर्ज व्हेरीफाय झाले नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे बदल्यांचे गु-हाळ तांत्रिक अडचणींमुळे लांबण्याची शक्यता आहे. 

जिल्ह्यात ५ हजार ४३९ शिक्षक बदली पात्र ठरले आहेत. दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाल्याने त्यांना  अर्ज भरण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. परंतु यातील संवर्ग १ व २ मधील ९० टक्के एकल शिक्षकांपुढे सुरक्षेचा प्रश्न आहे. ही बदली पद्धती अन्याय करणारी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आॅनलाईन बदल्यांसाठीचे अर्ज भरताना शिक्षकांची दमछाक झाली. बदल्यांचे पोर्टल सर्व्हर डाऊन झाल्यामुळे शिक्षकांना अर्ज अनेकवेळा भरावा लागत होता. 

यासाठी बहुतांश शिक्षकांनी रात्र- रात्र जागून काढली. तरीही २११ शिक्षकांनी अर्ज भरले नसल्याची बाब समोर आली. तसेच इतर ५१ शिक्षकांच्या अर्जाची पडताळणी झाली नाही. त्यामुळे आधी या शिक्षकांना अर्ज दाखल करावे लागणार आहेत. त्यांना अर्ज भरण्यासाठी ठराविक कालावधीची सवलत देण्यासाठी शिक्षण विभागाने वरिष्ठांकडून मार्गदर्शन मागविले आहे. उद्भवणाºया तांत्रिक अडचणींवर मार्ग काढण्याबाबत शिक्षण विभागाची यंत्रणाही पेचात आहे. 

जिल्ह्यात तीन वर्षांपुर्वी १४३६ प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या होत्या. परंतू त्या भाषा, गणित, विज्ञान विषयवार झाल्या नव्हत्या. केवळ घोडेबाजाराला महत्त्व देण्यात आले होते. आता शासन निर्णयाप्रमाणे होणा-या बदली प्रक्रियेत अडथळे येण्याची शक्यता आहे. १४३६ शिक्षकांना दर्जावाढ अगोदर करणे आवश्यक आहे. मागे झालेल्या चुकीच्या पदोन्नतीमुळे गोंधळ वाढण्याची शक्यता अधिक आहे.  या नियुक्त्या रद्द करण्याबाबत प्रस्तावही निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे. या शिक्षकांना जेथे नियुक्त केले जाणार तेथे पटसंख्या नियमाप्रमाणे असणे गरजेचे आहे. त्यामुळे शिक्षक बदल्यांचे गु-हाळ सुरुच राहणार आहे.शिक्षक मोर्चाचे नियोजन

बदल्यांना विरोध नाही, परंतु चुकीच्या पध्दतीला विरोध आहे. निम्मे शैक्षणिक वर्ष संपले आहे. अशा वेळी बदल्या केल्या जात आहेत. २७ फेब्रुवारी २०१७ चा शासन निर्णय रद्द करावा, २०१४ च्या सर्वसमावेशक निर्णयानुसार बदल्या कराव्यात या मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्या असून एकच समन्वय समिती स्थापन केली.

श्रेयासाठी नव्हे, न्यायासाठी बीड येथे ३० आॅक्टोबर रोजी काढण्यात येणाºया मोर्चाच्या अनुषंगाने शिक्षक समन्वय समितीच्या बैंकीत ठरल्याप्रमाणे मोर्चाच्या अग्रभागी सर्व शिक्षिका राहणार आहेत. त्यानंतर पदाधिकारी व शिक्षक  राहणार आहेत. प्रशासनाला शिक्षिकाच निवेदन देणार असून भाषणही त्याच करणार आहेत.

अशा होणार बदल्यासहशिक्षक                ४०४८मुख्याध्यापक           ३३५प्राथमिक पदवीधर    १०५६एकूण                       ५४३९