शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात कडबा भडकला, शेतकरी ऊस विकू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 17:37 IST

जिल्हयात पावसाने मोठी ओढ दिल्याने संभाव्य दुष्काळजन्य स्थितीमुळे पशुधनाच्या कडब्याचे भाव झपाट्याने वाढले आहेत.

बीड : जिल्हयात पावसाने मोठी ओढ दिल्याने संभाव्य दुष्काळजन्य स्थितीमुळे पशुधनाच्या कडब्याचे भाव झपाट्याने वाढले आहेत. जूनमध्ये १७०० रुपये शेकडा मिळणारा कडबा सध्या २५०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. कडबा टंचाईमुळे पशुपालक हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतातील ऊस  जळून जाण्याआधीच उपटलेला ऊस शेतकरी बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. 

बीड जिल्ह्यात यावर्षी पावसाची अवकृपा राहिली. वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ४८ टक्के तोही अनियमित व विषम प्रमाणात झाला आहे. पीक परिस्थिती बिकट असतानाच पशुधन सांभाळणाऱ्या पालकांना चाऱ्याचा प्रश्न भेडसावत आहे. मागील वर्षी पाऊसप्रमाण चांगले राहिल्याने जलसाठ्यात वाढ झाली. समाधानकारक पातळीमुळे पाण्याची टंचाई भासली नाही. परंतू यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दगा दिला. त्यामुळे आॅगस्टपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. तर चाऱ्याची मुबलक उपलब्धता होती. त्यामुळे मे- जूनमध्ये कडब्याचे भाव शेकडा १७०० ते २००० रुपये इतके होते. बीडमध्ये नगर, उस्मानाबाद जिल्ह्यातून कडब्याची आवक बऱ्यापैकी होती. नंतर मात्र पाऊस नसल्याने व दुष्काळी चाहूल लागल्याने कडब्याचा पुरवठा कमी होऊ लागला आहे. 

दिवसेंदिवस मागणी वाढत असल्याने संभाव्य परिस्थिती लक्षात घेत कडब्याच्या दरात तेजीचे वारे सुरू आहेत. सध्या येथील बाजारात कडब्याचे भाव शेकडा २५०० ते २६०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.  कडब्याचे दर १७०० वरून २५०० पर्यंत पोहोचले आहेत, तर वाढ्यासह उसाचे भाव १७०० ते १८०० रुपये आहेत. त्यामुळे कडब्याच्या जागी उसालाही पशुपालक पसंती देत आहेत. पशुधन जगविण्यासाठी पशुपालकांची कसरत सुरु आहे.

बीड येथील मंडईत कोल्हारवाडी, इमामपूर, वायभटवाडी, बीड, काठोडा, पिंपळनेर तसेच तालुक्यातील इतर गावातून शेतकरी कडबा खरेदीसाठी येतात. कडब्याचे भाव लक्षात घेत पशुपालकांनीही आखडते घेतले आहे. लागेल त्यापेक्षा कमी प्रमाणात कडबा खरेदी करतात, असे मधुकर चांदणे म्हणाले. सध्या उत्पादक व मोठ्या व्यापाऱ्यांकडून कडबा पुरवठा कमी होत आहे. पावसावरच भिस्त आहे. पाऊस चांगला झाल्यास कडब्याचे भाव शेकडा १५०० ते २००० रुपये होऊ शकतात, असे सय्यद बाबूभाई यांनी सांगितले. पाऊस परिस्थतीचा अंदाज घेत काही उत्पादक शेतकरी त्यांच्याकडील कडब्याचा स्टॉक तसेच ठेवणे पसंत केले आहे. आणखी तेजीची त्यांना शक्यता आहे. 

एकीकडे कडब्याचे भाव वाढत असताना दुसरीकडे ऊस उत्पादक शेतकरी पावसाअभावी ऊस वाळून जात असल्याने तसेच हुमणीचा प्रादुर्भाव वाढल्याने नुकसान होण्यापेक्षा येथील कडबा मंडईत वाढ्यासह ऊस विक्रीस आणत आहेत. तालुक्यातील १५ ते २० शेतकरी आर्थिक गरजेनुसार त्यांचा ऊस स्वत: विकत आहेत. 

व्यापाऱ्यांनी फिरवली पाठ; कामगारांचा रोजगार घटलाबीड येथील कडबा मंडईत लहान- मोठे २० पेक्षा जास्त व्यापारी आहेत. तर २५-३० कामगार हमाली व इतर कामातून गुजराण करतात. सध्या कडबा मिळत नसल्याने व उपलब्ध कडबा महाग असल्याने तसेच भांडवली गुंतवणूक वाढल्याने या व्यवसायातील काही जण इतर व्यवसायांकडे वळले आहेत. तर आवक घटल्याने कामगारांचा रोजगार घटल्याचे शेख मजहर म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र