शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक वसाहतीत उद्योगाचा श्रीगणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:07 IST

मागील चौदा वर्षापासून धारूर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एकही प्रकल्प उभा राहिला नव्हता; परंतु आता या वसाहतीमध्ये आधुनिक पद्धतीचा देशातील पहिला गूळ उद्योग उभारण्यात येत असून या प्रकल्पाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले आहे.

ठळक मुद्देचौदा वर्षांच्या वनवासानंतर औद्योगिक वसाहतीस ऊर्जितावस्था : सात कोटी रु पयांच्या गूळ प्रकल्प उद्योगाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कधारूर : मागील चौदा वर्षापासून धारूर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एकही प्रकल्प उभा राहिला नव्हता; परंतु आता या वसाहतीमध्ये आधुनिक पद्धतीचा देशातील पहिला गूळ उद्योग उभारण्यात येत असून या प्रकल्पाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले आहे. यामुळे भविष्यात आता येथील औद्योगिक वसाहतीला महत्त्व येणार असल्याचे चित्र दिसत आहे .धारूर येथे औद्योगिक वसाहत उभी राहावी म्हणून अनेक वर्षापासून नागरिकांची मागणी होती. ती पूर्ण करण्यासाठी तत्कालीन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नानंतर औद्योगिक वसाहतीचा मार्ग मोकळा होऊन शासनाने आडस रोडवरील ३३ एकर जागा अधिग्रहित केली होती . या जागेचे पैसे शेतकऱ्यांना देण्यात आले होते. मागील चौदा वर्षांपूर्वी या वसाहतीचे भूमिपूजन जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले होते. परंतु नंतर या जागेत आतापर्यंत एकही उद्योग उभा राहिला नव्हता. यासाठी नंतर राजकीय नेत्यांकडूनही पाठपुरावा झाला नाही. निवडणुका आल्या की औद्योगिक वसाहत उभी करू अशी आश्वासने दिले जात होती; मात्र प्रत्यक्षात काहीच होत नव्हते . काही शेतकºयांनी मात्र या जागेमध्ये पेरणी केली, तर काही जागा पडीक स्वरूपात राहिली.धारूर येथील रहिवासी नामदेव गोरे यांची पुणे येथे सुभद्रा मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. कंपनीमार्फत त्यांनी धारूर येथील औद्योगिक वसाहतीची जागा खरेदी करून ती ताब्यात घेतली आहे. या जागेमध्ये देशातील पहिला आधुनिक पद्धतीचा गूळ प्रकल्प ते उभा करणार आहेत. या प्रकल्पात विनाकेमिकल स्वरूपाचा गूळ तयार करण्यात येणार आहे. ७ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे भूमिपूजन नुकतेच झाले.औद्योगिक वसाहतीच्या जागेत हा प्रकल्प उभा राहत असल्याने या वसाहतीला महत्त्व आले आहे. हा प्रकल्प उभा राहिल्यास यातून धारूर व परिसरातील तरुणांच्या हाताला काम सुद्धा मिळणार आहे. औद्योगिक वसाहतीच्या जागेमध्ये उभा करण्यात येत असलेला प्रकल्प हा देशातील पहिला प्रकल्प असून, चार महिन्यांमध्ये या प्रकल्पाचे ट्रायल करण्यात येणार असल्याचे सुभद्रा कंपनीचे चेअरमन नामदेव गोरे यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडMIDCएमआयडीसी