शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अनाकलनीय ! वानरांकडून महिनाभरात २५० कुत्र्यांच्या पिलांची हत्या, उंचावर घेऊन जात देत आहेत फेकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 17:20 IST

Monkey kills Puppies : उंच इमारत किंवा झाडा घेऊन जात पिलांना खाली फेकून देत आहेत वानरे

- पुरूषोत्तम करवामाजलगाव : तालुक्यातील लवुळ येथे मागील एक महिन्यापासून वानरांनी धुमाकूळ घातला आहे. गावात कुत्र्याचे पिल्लू दिसले की वानर त्यास उचलून घेऊन जात उंच ठिकाणावरुन खाली फेकून देत त्यांचा जीव घेत आहेत (Monkey kills Puppies by unknown reason ) . या वानरांनी आतापर्यंत 200-250 कुत्र्यांच्या पिलांचा बळी घेतला असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. या अनाकलनीय घटनेकडे मात्र वन विभागाचे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. 

माजलगाव शहरापासून 10 कि.मी. अंतरावर लवुळ हे गाव आहे. या ठिकाणची लोकसंख्या पाच हजाराच्या घरात आहे. या ठिकाणी मागील दीड ते दोन महिन्यापासून तिन वानरांचा वावर आहे. हे वानरं मागील एक महिन्यापासून गावात असलेले कुत्र्यांची पिल्लं उचलून घेऊन जात आहेत. त्यानंतर पिलांना घेऊन उंच झाडावर किंवा घरावर जात तेथून फेकून देत आहेत. उंचावरून पडल्याने पिलांचा लागलीच मृत्यू होत आहे. आतापर्यंत या वानरांनी 200-250 पेक्षा जास्त कुत्र्यांचा पिलाचा बळी घेतला असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

याच गावातील सिताराम नायबळ यांच्या कुत्र्याच्या पिल्लाला 15 दिवसापूर्वी वानर घेऊन गेले होते. हे पिल्लू ओरडत असल्याने सिताराम नायबळ हे गच्चीवर जाऊन पिलाला सोडवण्याचा प्रयत्न करत असताना वानर त्यांच्या अंगावर धावून आले असता सीताराम नायबळ हे पळत असताना गच्ची वरून खाली पडले त्यात त्यांचा पाय मोडला. त्यांच्यावर मागील पंधरा दिवसांपासून उपचार सुरू होते. याचबरोबर अनेक जण जखमी झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.         

याबाबत येथील ग्रामपंचायतीने धारूर येथील वनविभागाच्या धिकार्‍यांशी संपर्क केला असता ते केवळ एक दिवस आले व थोडावेळ त्या वानरास पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांना ते वानर पकडता न आल्याने ते निघून गेले. त्यानंतर ते इकडे फिरकले देखील नाही. यामुळे लवुळकरांचा वनविभागाच्या अधिका-यांच्या विरोधात रोष निर्माण होतांना दिसत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूMonkeyमाकडdogकुत्राBeedबीड