शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

गैरहजेरीबाबत विचारताच सीएचओंच्या पतीकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी

By सोमनाथ खताळ | Updated: September 16, 2022 14:42 IST

धारूर तालुक्यातील आसोला आरोग्य उपकेंद्रातील घटना : वैद्यकीय अधिकाऱ्याने मॅग्मो संघटनेकडे मांडली कैफियत

- सोमनाथ खताळबीड : धारूर तालुक्यातील आसोला आरोग्य उपकेंद्राला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली. येथील वारंवार गायब असणाऱ्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना विचारणा करताच त्यांच्या पतीने डॉक्टरला बाहेर हाकलले. शिवाय जीवे मारण्याची धमकीही दिली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. या प्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात नोंद झाली नसली तरी डॉक्टरने मॅग्मो संघटनेला मदत करण्याची विनंती केली आहे.

धारूर तालुक्यात रूई धारूर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. याच अंतर्गत आसोला उपकेंद्र येते. सीएचओ म्हणून भाग्यश्री भोसले कार्यरत आहेत. शुक्रवारी दुपारच्या सुमारास रूई धारूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा पवार यांनी उपकेंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी भाेसले यांना वारंवार गैरहजर रहात असल्याबाबत जाब विचारला. याचवेळी भोसले यांचे पती डॉ.अरविंद निपटे तेथे आले. त्यांनी डॉ.पवार यांना अरेरावीची भाषा वापरत उपकेंद्रातून बाहेर हाकलले. शिवाय जीवे मारण्याची धमकीही दिली. विशेष म्हणजे डॉ.निकटे हे देखील धारूरमध्ये रूग्णवाहिकेवरील वैद्यकीय अधिकारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, हा प्रकार घडताच डॉ.पवार यांनी मॅग्मो संघटनेला संदेश पाठवून मदत करण्याची मागणी केली आहे. संघटनेच्या सदस्यांनी त्यांन आधार देत पोलीस तक्रार देण्याचा सल्ला दिला. परंतू दुपारी २ वाजेपर्यंत कसल्याही प्रकारची नोंद झालेली नव्हती.

मॅग्मोकडे मागितली मदतआज प्रा.आ.केंद्र रूईधारूर येथील आसोला उपकेंद्राला भेट दिली, तेथील सीएचओ प्रत्येक भेटी ला गैरहजर होत्या. तर आज सीएचओचे मिस्टर मला येऊन आरेरावी, शिव्या व उपकेद्राच्या बाहेर निघ तुला जीवे मारून टाकतो व तसेच आज जर निट निघालास, नसीब तुज. निघ बाहेर (उपकेंद्राच्या) जीवे मारण्याची धमकी दिली. तरीही मॅग्मोनी यामध्ये लक्ष केंद्रित करावे, असा मेसेज सोशल मिडीयाच्या ग्रुपवर पाठवून मदत मागितली आहे. यावर सर्वच सदस्यांनी त्यांना संपर्क करून तक्रार देण्याचा सल्ला दिला आहे. तसेच अनेकांनी मानसिक आधार दिला.

वैद्यकीय अधिकारी आणि सीएचओ या दोघांनाही बोलावले आहे. दोघांनाही समोरासमोर बसवून म्हणने ऐकले आहे. आता इतर कर्मचाऱ्यांचे पण म्हणने ऐकून घेणार आहे. याबाबत वरिष्ठांनाही कळविले आहे.- डॉ.शहाजी लोमटे, तालुका आरोग्य अधिकारी धारूर

मी थोडा बिझी आहे. मला आताच काही बोलायचे नाही. मी आपणास थोडा वेळाने कॉल करतो.- डॉ.कृष्णा पवार, वैद्यकीय अधिकारी, रूई धारूर

मी सध्या पोलीस ठाण्यात आहे. तुम्हाला थोडा वेळात कॉल करतो.डॉ.अरविंद निकटे, सीचओंचे पती

टॅग्स :Beedबीडdoctorडॉक्टर