शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

संस्थात्मक विलगीकरण प्रक्रियेचा अंमल करा; सरपंच, ग्रामसेवकांना कारवाईची पुन्हा तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 17:28 IST

लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांकडून कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत.

ठळक मुद्देजिल्हा परिषद सीईओंचे यंत्रणेला निर्देश  कुठल्याही परिस्थितीत घरात राहता येणार नाही

बीड  : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांसाठी संस्थात्मक विलगीकरण प्रक्रियेबाबत सरपंच, ग्रामसेवकांना त्यांचे कर्तव्य चोख बजावण्याचे पुन्हा एकदा आदेश देण्यात आले असून, हलगर्जी करणाऱ्यांना कारवाईची तंबी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली.

लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांकडून कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. या अनुषंगाने बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संस्थात्मक विलगीकरण करणे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेशाद्वारे बंधनकारक केले आहे.

दरम्यान, कोविड रुग्णांचे लक्षणे नसलेले, सौम्य, अतिसौम्य आणि तीव्र लक्षणांमध्ये वर्गीकरण करुन त्यांना सीसीसी, सीएचसी व डीसीएचमध्ये दाखल करावयाचे आहे. लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना त्यांच्या घरात योग्य सुविधा असतील तर संमतीनुसार होम आयसोलेशनचा पर्याय उपलब्ध करुन देता येईल. होम आयसोलेशन संदर्भात कार्यप्रणाली, पात्रता व अपात्रतेबाबत निकष, रुग्णांची काळजी घेण्याबाबत सीईओंनी आरोग्य यंत्रणेला दिशा निर्देश जारी केले आहेत. 

कुठल्याही परिस्थितीत घरात राहता येणार नाही- संस्थात्मक विलगीकरणासाठी गाव स्तरावर शाळा, महाविद्यालय,  मंगल कार्यालय अथवा योग्य ठिकाण निश्चित करुन तेथे स्वच्छतागृह,  पाणीपुरवठा, वीज, निवास व्यवस्थेबाबत कळविलेले आहे.- चेक पोस्टवर नोंदणी झालेल्या नागरिकांची पंचायत समिती नियंत्रण कक्षाकडून ग्रामपंचायतला माहिती मिळताच जिल्हा बाहेरून प्रवेश केलेल्या नागरिकांना संस्थात्मक विलगीकरणाच्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. त्यांना कुठल्याही परिस्थितीत स्वत:च्या घरात राहता येणार नाही.- जिल्हा बाहेरून येणाऱ्या व्यक्तींसाठी स्वतंत्र नोंदवही ठेवून दैनंदिन प्रवेशाच्या नोंदी ठेवणे, ग्राम सुरक्षा समिती कार्यरत ठेवणे, गावातील कोविड संशयित रु ग्णांची माहिती तात्काळ आरोग्य विभाग पंचायत समितीला कळविणे महत्त्वाचे आहे.

सरपंच, ग्रामसेवक जबाबदार- बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींच्या संस्थात्मक विलगीकरणाबाबत वेळोवेळी सूचना व आदेश देऊनही बहुतांश ग्रामपंचायत पातळीवर कुठलीही कार्यवाही होत नसल्याचे आॅनलाइन अहवालावरून दिसून आले आहे.- काही गावातील सरपंच व ग्रामसेवक हे गावात राहत नसल्याचेही निदर्शनास आल्याने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.- गावस्तरावर निष्काळजीपणा केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचे अंतिमरित्या कळविले आहे. 

कोरोना टाळण्यासाठी प्रभावी अंमल करागावातील नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवणे हे सरपंच आणि ग्रामसेवकांचे मूलभूत कर्तव्य आहे. त्यांनी गावात राहणे बंधनकारक आहे. संस्थात्मक विलगीकरण करणे, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गावात आवश्यक उपाययोजना मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग, गर्दी होऊ न देणे, बाजार भरू न देणे, नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे आदी सूचना तात्काळ अंमलात आणाव्यात असे स्पष्ट निर्देश सीईओंनी दिले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड