शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

फरदड कापूस घेतल्यास पुन्हा बोंडअळीचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:32 IST

जिल्ह्यात शेंदरी बोंडअळीमुळे झालेले कपाशी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भविष्यात हा धोका टाळण्यासाठी आता कृषी विभागाने फरदड कापूसमुक्त गाव अभियान राबविण्यासाठी मोहीम सुरु केली आहे.

ठळक मुद्देफरदड कापूसमुक्त गाव अभियान : डिसेंबरमध्येच व्यवस्थापन करून बोंडअळीचा नायनाट करण्याचा कृषी सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात शेंदरी बोंडअळीमुळे झालेले कपाशी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भविष्यात हा धोका टाळण्यासाठी आता कृषी विभागाने फरदड कापूसमुक्त गाव अभियान राबविण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. डिसेंबरमध्ये बोंडअळीच्या पतंगाना पोषक वातावण असल्याने वेळीच व्यवस्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.फरदड कापुस अभियानाअंतर्गत जिल्हास्तरावर व्यापक प्रमाणात मोहिम राबविण्यात येत आहे. बीड जिल्ह्यात कापसाचे ३ लाख ३९ हजार हेक्टर क्षेत्र आहे. नुकत्याच झालेल्या खरीप हंगामात जिल्ह्यात ३ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रात बी. टी. वाणाच्या कापसाची लागवड करण्यात आलेली आहे. शेंदरी बोंड अळीमुळे कापूस पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. मागील वर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठीदेखील कृषी विभागाने पºहाटीसह उपटून काढण्याचे आवाहन तसेच सुप्त अवस्थेत अळी शेतात राहू नये या दक्षतेबाबत मार्गदर्शन केले होते. मात्र फरदड कापूस घेण्याकडेच शेतकऱ्यांचा कल राहिल्याने नुकत्याच संपलेल्या खरीप हंगामात मोठे नुकसान झाले. पहिल्या वेचणीतच कापसाचा झाडा होऊन उतारा केवळ २५ ते ३० टक्केच मिळाला. डिसेंबरमध्ये वातावरण बोंडअळीसाठी अनुकूल असते. कपाशीच्या पºहाटया किंवा वाळलेल्या नख्यामध्ये गुलाबी बोंडअळी सुप्त अवस्थेत जाण्याची शक्यता असते. त्यामुळे कपाशीचे शेतातील अवशेष नष्ट करणे आवश्यक बनते. त्यामुळे गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रcottonकापूस