शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण करायचे नव्हते तर रिपोर्ट तयार नसताना गुन्हा दाखल करण्याची घाई का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 01:01 IST

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेचे राजकारण करायचे नव्हते तर घटनेचा कोणताही रिपोर्ट आला नसताना कारखान्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची घाई का? असा सवाल राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी केला आहे.

ठळक मुद्देपंकजा मुंडे यांचा आरोप : घटनास्थळावर जाण्यास रोखल्याचे वक्तव्य चुकीचे

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेचे राजकारण करायचे नव्हते तर घटनेचा कोणताही रिपोर्ट आला नसताना कारखान्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची घाई का? असा सवाल राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी केला आहे. घटनास्थळावर जाण्यास मनाई केल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात ८ डिसेंबर रोजी झालेल्या दुर्घटनेत बारा कर्मचारी जखमी झाले, त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. दोन वर्षाच्या संघषार्नंतर कारखान्याची परिस्थिती पुर्ववत चागली झाली असताना नेमके मुंडे साहेबांच्या जयंतीच्या अगोदर झालेली दुर्घटना हादरून टाकणारी व विचारात पाडणारी आहे असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

या घटनेनंतर जखमींना योग्य उपचार देणं, कारखान्यातील यंत्रणेला मनोबल देणं हे प्रथम कर्तव्य असतं, जे आम्ही व आमच्या संचालकांनी चोखपणे बजावण्याचा प्रयत्न केला, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. याउलट घटना घडल्यानंतर जखमींना मदत करायची सोडून काहींनी कारखान्याचे घटनास्थळ गाठून, फोटो काढून स्वत:च्या शाबासकीच्या बातम्या स्वत:च देणं आणि कारखान्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा असे त्यांनी केलेले स्टेटमेंट राजकारणाने बरबटलेलं होते असा टोलाही पंकजा यांनी लगावला.

घटनास्थळ सीलतपासात अडचणी येऊ नये, यासाठी घटनास्थळ सील केलेले होते. याठिकाणी कोणालाही जाऊ देऊ नये, असे निवेदन पोलीस अधीक्षकांना दिले होते. यामध्ये कोणाचेही वैयक्तिक नाव नव्हते. त्यामुळे आपल्याला रोखण्यात आल्याचे धनंजय मुंडे यांचे वक्तव्य चुकीचे आहे, रोखणाºया पोलीस अधिका-यांना अधिवेशनात बघून घेऊ, अशी अशोभनीय भाषा करून पदाचा गैरवापर करणा-या विरोधी पक्षनेत्यांनी तपास यंत्रणेला सहकार्य करणे अपेक्षित होते.- पंकजा मुंडे, ग्रामविकास मंत्री