शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

तिकीट दिले तर तयारीला लागेल, आता कुणापुढे पदर पसरायला जाणार नाही: पंकजा मुंडे

By अनिल लगड | Updated: October 5, 2022 14:43 IST

पंकजा मुंडे यांनी मांडली रोखठोक भूमिका

सावरगाव घाट ( बीड) : आगामी 2024 च्या विधान सभेत पक्षाने तिकीट दिले तर तयारीला लागेल. मला, पक्षाला, नेत्याला त्रास द्यायचा नाही. लक्ष 2024 ची तयारी करू. गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर कमळाशिवाय दुसरे बटन लावले नाही. मी आता कुणापुढे पदर पसरायला जाणार नाही, अशी रोखठोक भूमिका माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आज मांडली.

भगवान भक्ती गड येथे मेळाव्यास पंकजा मुंडे संबोधित करत होत्या. दरवर्षी प्रमाणे भगवान भक्तीगड येथे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र, तेलंगाना, गुजरात, कर्नाटक येथून अनेक भाविक भगवान भक्ती गडावर दर्शनासाठी आले आहेत. यावेळी आयोजित मेळाव्यास माजी मंत्री तथा भाजप राष्ट्रीय सचिन पंकजा मुंडे यांनी संबोधित केले. त्या म्हणाल्या, राज्यातुन, राज्याबाहेरून लोक आलेत. नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रूपे असतात. मी देवीच्या पुढे नतमस्तक होऊन गोरगरीब, ऊस तोडणी मजुरांसाठी आशीर्वाद मागते. दसरा, नवरात्रीच्या सर्वाना शुभेच्छा. आता दसरा मेळावा आहे. हा मेळावा चिखलफेक करणाराचा नाही. चिखल तुडविणाराचा आहे.

मी कधी थकणार नाही, मी झुकणार नाही

मी कधी विरोधकांवर टीका केली नाही. चर्चा, अफवा पसरवितात. ही गर्दी ही शक्ती आहे. प्रीतम म्हणाल्या, संघर्ष करा घोषणा बंद करा. पण संघर्ष नाकारू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनाही संघर्ष करावा लागला. भगवानबाबांना संघर्ष करावा लागला. गोपिनाथ मुंडे यांना संघर्ष करावा लागला. मी संघर्षाला घाबरत नाही. मी वचनाला चुकणार नाही, मी कधी थकणार नाही, मी झुकणार नाही, असे ही पंकजा मुंडे म्हणाल्या.

तिकीट दिले तर तयारीला लागलेराजकारण करताना मानवतेचे कल्याण विसरायला नको. सभा घेण्यासाठी मी फिरले की नाही. मी राज्यात फिरले. आमदार वाढले तर पक्षाची ताकद वाढते. मी 17 वर्षे राजकारणात आहे. व्यक्ती श्रेष्ठ नाही. संघटन श्रेष्ट आहे. मी नाराज नाही. मी मंत्री, आमदार नाही. स्वाभिमान आहे. मला गर्व नाही. मी असत्य कधी बोलणार नाही.  सत्य कधी पराजित होत नाही. 2024 ला पक्षाने तिकीट दिले तर तयारीला लागेल. मला , पक्षाला नेत्याला त्रास द्यायचा नाही, असेही मुंडे यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीड