शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

लग्न करीन तर त्याच्यासोबतच, बीडमध्ये खडतर प्रेमाचा आनंदोत्सवाने समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 19:52 IST

शनिवारी अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा साध्या पद्धतीने पण आनंदात पार पडला. त्यांच्या प्रेमाचा खडतर सुरू झालेला प्रवास अखेर आनंद सोहळ्याने पूर्ण झाला. 

ठळक मुद्देन्यायालयाने विवाहास दिली परवानगी

बीड : शेजारीच राहणाऱ्या भावकितील मुलीला घेऊन पलायन केले. एक मुलगीही झाली. नंतर पोलिसांनी शोधून आणल्यावर प्रियकरावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला. परंतू मुलगी ठाम राहिली. लग्न करीन तर त्याच्यासोबतच, असा तिने हट्ट धरला. मग न्यायालयाने यावर योग्य ती कारवाई करून त्या दोघांचा विवाह लावण्यास परवानगी दिली. त्याप्रमाणे शनिवारी अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा साध्या पद्धतीने पण आनंदात पार पडला. त्यांच्या प्रेमाचा खडतर सुरू झालेला प्रवास अखेर आनंद सोहळ्याने पूर्ण झाला. 

धारूर तालुक्यातील एका गावात सुरेश व सोनाली (नाव बदललेले) हे शेजारीच राहतात. भावकीच असल्याने दोघांचेही जवळचे नाते. त्यांनी ९ डिसेंबर २०१७ रोजी पलायण केले. धारूर ठाण्यात अपहरणाचा गुन्हाही नोंद झाला. सोनाली तेव्हा १७ वर्षांची होती. ते दोघेही पुण्यात राहिले. सुरेशने कंपनीत काम केले तर सोनाली घरीच राहत होती. दोघेही पती-पत्नीप्रमाणे राहत होते. २०१८ साली सोनाली गर्भवती राहून तिने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर १६ फेब्रुवारी २०१९ रोजी पोलिसांनी तपास करून त्यांना ठाण्यात आणले. त्यानंतर सुरेशविरोधात आगोदरच्या गुन्ह्यात अत्याचार, पोस्को आदी कलमे वाढली. हे प्रकरण माजलगाव न्यायालयात गेले. दरम्यान, न्यायालयातही सोनालीने बाजू बदलली नाही. संसार करील तर सुरेश सोबतच, असे तिने मनाशी ठाम निश्चीत केले होते. न्यायलायानेही सर्व बाजू समजून घेत त्या दोघांचे लग्न लावण्यास परवानगी दिली. त्याप्रमाणे शनिवारी बीडमधील सामाजिक न्याय भवनात बौद्ध पद्धतीने त्यांचा विवाह साध्या पद्धतीने पण आनंदाच्या वातावरणात पार पडला. त्यांच्या प्रेमाला अखेर न्याय मिळाला, अशी चर्चा होती. अधिकारी बनले नातेवाईक, सामाजिक कार्यकर्ते वऱ्हाडीया विवाह सोहळ्यात सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी, महिला व बालविकास अधिकारी आर.डी. कुलकर्णी हे मुलीचे मामा झाले तर जिल्हा समाजकल्याण अधिकारी राजू एडके, वित्त व लेखा अधिकारी शिवप्रसाद जटाळे हे मुलाचे मामा बनले. जिल्हा कृषी विकास अधिकारी सुभाष साळवे हे भंते बनले आणि सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे व अशोक तांगडे यांनी वऱ्हाडी म्हणून भूमिका बजावली. शासकीय वाहनातून बिदाईआनंदात विवाह सोहळा पार पडल्यानंतर सोनालीला फुलांनी सजलेल्या शासकीय वाहनातून बिदाई करण्यात आली. सोहळ्याला रक्ताचे नातेवाईक कोणीच नव्हते. अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांचे आशिर्वाद घेऊन हे जोडपे संसार करण्यासाठी वाहनात बसून गावाच्या दिशेने रवाना झाले.

टॅग्स :marriageलग्नBeedबीडCrime Newsगुन्हेगारी