गेवराई : शहरातील उपजिल्हा रुग्णालय, नगर परिषदेचे छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, कस्तुरबा गांधी विद्यालय तसेच गढी येथील अध्यापक महाविद्यालय अशा चार ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू असून, ३३८ रुग्ण उपचार घेत आहेत. या सर्व केंद्रावर स्वच्छता, जेवण व इतर सुविधा चांगल्या आहेत. मात्र रुग्णाला देण्यात येणारे रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असून, प्राणवायू कधी संपेल याची शाश्वती नाही. सर्व कोविड सेंटरमध्ये स्वच्छता, राहण्यासाठी बेड, चांगल्या प्रतीचे जेवण, पंखे, विजेची चांगली सुविधा आहे.तसेच डाॅक्टर, परिचारिका, वॉर्डबाॅय हजर असतात, परंतु महत्त्वाच्या बाबींची उणीव भासते. कोविड सेंटरवर सुरक्षारक्षक नसल्याने रुग्णाला जेवणाचे डबे देण्यासाठी व भेटण्यासाठी येणारे नातेवाईक सर्रासपणे कोविड सेंटरमध्ये जात असल्याने नातेवाइकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.
सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचा ताण मोठ्या प्रमाणात वाढत असलातरी परिपूर्ण आरोग्य सेवा पुरविण्याचा प्रयत्न करत आहोत. रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुतवडा आहे. यावरही लवकरच उपाययोजना करण्यात येतील. नागरिकांना कोविड सेंटरमध्ये जाण्यास सक्त मनाई करण्यात येईल, असे येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक महादेव चिंचोळे यांनी सांगितले.
( सोबतचे फोटो येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये डबे घेऊन जाताना रुग्णांचे नातेवाईक)
===Photopath===
210421\20210414_113557_14.jpg