शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:58 IST

चारित्र्यावर संशय घेऊन कुºहाडीचे घाव घालून पत्नीचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या पतीला जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्या. नाझेरा शेख यांच्या न्यायालयाने मंगळवारी (२९ जानेवारी) सुनावली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : चारित्र्यावर संशय घेऊन कु-हाडीचे घाव घालून पत्नीचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या पतीला जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्या. नाझेरा शेख यांच्या न्यायालयाने मंगळवारी (२९ जानेवारी) सुनावली.शहरातील नरसोबा नगर, धानोरा रोड भागात उत्तम मारोती भंडारे यांचे कुटुंब राहते. १४ ते १५ जून २०१५ रोजीच्या रात्री उत्तम भंडारे याने पत्नी रुख्मिणीबाई हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन ती झोपेत असताना तिच्या डोक्यात, तोंडावर आणि मानेवर कु-हाडीने गंभीर जखमी करुन तिचा खून केला. याप्रकरणी रुख्मिणीबाई हिचा मुलगा बाळू उत्तम भंडारे याच्या फिर्यादीवरुन उत्तम भंडारे विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक वाय. व्ही. बारवकर यांनी सखोल तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हे प्रकरण बीड सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व अति. सत्र न्या. नाझेरा शेख यांच्या न्यायालयात झाली. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षाच्यावतीने १० साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अजय दि. राख यांनी काम पाहिले. त्यांना सहायक सरकारी वकील बी.एस.राख यांनी सहकार्य केले. याप्रकरणी न्यायालय पैरवी अधिकारी म्हणून पोउपनि आर.बी. मोरे, हेकॉ एस. डी. जाधव यांनी काम पाहिले.या प्रकरणी मयताचा मुलगा, सुन व लहान नातु या साक्षीदारांसहित इतर साक्षीदारांचे जबाब, आरोपीच्या अंगावरील कपडे व जप्त करण्यात आलेली कु-हाड, त्यावर आढळलेले रक्ताचे डाग व इतर परिस्थितीजन्य पुराव्यांचे अवलोकन करुन व जिल्हा सरकारी वकील अजय दि. राख यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन जिल्हा व अति. सत्र न्या. नाझेरा शेख यांनी आरोपी उत्तम मोरोती भंडारे यास कलम ३०२ प्रमाणे दोषी धरुन जन्मठेप तसेच १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.

टॅग्स :Courtन्यायालयMurderखूनLife Imprisonmentजन्मठेप