शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:19 IST

तालुक्यातील तांबवा येथील अंगणवाडी शिक्षिका असलेल्या पत्नीचा खून करून पतीने गळफास लावून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना गुरुवारी रात्री केज तालुक्यातील तांबवा शिवारातील शेतात घडली. दरम्यान, सध्या तरी कौटुंबिक वादाचे कारण सांगितले जात असले तरी अधिकृत दुजोरा मिळाला नाही.

ठळक मुद्देकेज तालुक्यात खळबळ : कौटुंबिक वादातून प्रकार घडल्याची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्ककेज : तालुक्यातील तांबवा येथील अंगणवाडी शिक्षिका असलेल्या पत्नीचा खून करून पतीने गळफास लावून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना गुरुवारी रात्री केज तालुक्यातील तांबवा शिवारातील शेतात घडली. दरम्यान, सध्या तरी कौटुंबिक वादाचे कारण सांगितले जात असले तरी अधिकृत दुजोरा मिळाला नाही.सुंदर बळीराम मुंडे (वय ५० वर्षे) आणि ललिता सुंदर मुंडे (वय ४६ वर्षे) अशी मयत पती-पत्नीची नावे आहेत. तांबवा येथील अंगणवाडी शिक्षिका ललिता चाटे यांचा विवाह नागझरी येथील सुंदर बळीराम मुंडे यांच्याशी झाला होता. पत्नीस तांबवा येथे अंगणवाडीची नोकरी असल्याने सुंदर मुंडे यांनी तांबवा येथेच जमीन घेतली आणि तेथेच शेती करून शेतातील घरात राहत असत. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. मुलीचा विवाह झाला आहे तर एक मुलगा मुंबई येथे नोकरीला असून दुसरा औरंगाबाद येथे शिक्षण घेत आहे. त्यामुळे घरात पती पत्नी दोघेच राहत होते.मागील काही दिवसापासून पती-पत्नीत सातत्याने भांडणे होत होती. सुंदर मुंडे यांनी गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घरी जेवण झाल्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर सुंदर मुंडे यांनी ललिताचा गळा दाबून खून केला. त्यानंतर सुंदरने पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून स्वत:च्या खिशात ठेवले आणि शेतातील बाभळीच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सुंदर मुंडे यांचा भाऊ रंगनाथ मुंडे यांच्या फिर्यादीवरून केज पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.घटनास्थळी पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांंनी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा केल्यानंतर दोघांचेही मृतदेह केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले होते. या घटनेमुळे केज तालुक्यात खळबळ उडाली आहे.१५ दिवसांत दुसरी घटनापंधरा दिवसांपूर्वीच तालुक्यातील ढाकेफळ येथील एका प्रियकराने प्रेयसीचा खून करून जवळच असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच तांबवा शिवारात दुसरी घटना घडल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.एकाच चितेवर अंत्यसंस्कारकेज येथील उपजिल्हा रुग्णालयात मुंडे दांम्पत्यांच्या पार्थिवाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर दोन्हीही पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान तांबवा शिवारातील त्यांच्या मालकीच्या शेतात शोकाकूल वातावरणात दोघांचेही पार्थिव एकाच चितेवर ठेवून अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखूनBeedबीड