शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो शेतकर्‍यांच्या पिकविम्याची रक्कम दुसर्‍यांच्या खात्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 18:07 IST

बॅक प्रशासन मात्र स्वतःची चूक झाकत विमा कंपनीकडे बोट दाखवत आहे. 

- पुरूषोत्तम करवा

माजलगाव ( बीड ) : प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी गतवर्षी पीक विमा भरला. त्यात प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेत भरण्यात आला. परंतू या बॅकेच्या गलथान कारभारामुळे अनेक शेतकर्‍यांची विम्याची रक्कम चक्क दुसर्‍याच्या खात्यावर जमा झाली आहे. परिणामी अनेक शेतकरी विम्याच्या रक्कमेपासून वंचित राहीले असून बॅक प्रशासन मात्र स्वतःची चूक झाकत विमा कंपनीकडे बोट दाखवत आहे. 

जिल्हा बॅक अन् शेतकरी हे एक जिव्हाळ्याचे नाते आहे. त्यामुळे जिल्हा बॅकेत व्यवहार करण्यास शेतकरी प्राधान्य देतात. परंतू जिल्हा बॅकेकडून गलथान कारभार करून शेतकर्‍यांना अडचणीत आणण्याचे काम होत आहेत. असाच प्रकार जिल्हा बॅकेच्या माजलगाव मुख्य शाखेत  उघड झाला आहे. मागील हंगाम 2018 मध्ये शेतकर्‍यांची पीक विमा भरतांना जिल्हा बॅकेचे पासबुक, आधार कार्ड, 7/12 व 8 अ ही कागदपत्रे ऑनलाईन केले होते. त्यानूसार आता आपल्याला वीमा मंजुर झाला असल्याने आपल्या खात्यात विम्याची रक्कम आली. या आशेवर शेतकरी बॅकेत चकरा मारू लागले. परंतू बॅक अधिकार्‍यांकडून तुमच्या खात्यात पैसेच आले नाहीत असे उत्तरे देण्यात आली. यावर शेतकर्‍यांनी आम्ही पीक विमा अचूक भरलेला आहे. मग आमच्या खात्यात वीम्याची रक्कम कशी आली नाही, अशी विचारणा बॅक अधिकार्‍यांना केली. अधिकार्‍यांनी टोलवा-टोलवी करून उद्या या, परवा या असे सांगत वेळकाढूपणा केला. 

यावर शेतकर्‍यांनी सातत्याने बॅकेकडे चकरा मारून थकले व शेवटी शेतक-यांनी  नेमके आमचेच पैसे का आले नाही ? ते तरी सांगा यावर बॅक अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांचे पासबुक तपासले असता त्यात खाते क्रमांक चुकीचे आढळून आले. यावर त्यानी खाडाखोड करून अचूक खाते नंबर टाकले. यावर ही अधिकारी-कर्मचारी न थांबता तुमच्या विमा न येण्यास विमा कंपनी जबाबदार असल्याचे सांगितले. परंतू, वास्तविक जिल्हा बॅकेच्या गलथान पणामुळे खाते नंबरच चुकीचे असल्याने ती रक्कम दुसर्‍यांच्या खात्यावर गेली. या बॅकेच्या अक्षम्य चुकीमुळे मात्र शेतकरी वेठीस धरला जात असून हक्काच्या विम्याच्या रक्कमेपासून वंचित राहत आहे. हा प्रकार शनिवारी दि.20 रोजी दिंद्रुड मंडळातील कोथरूळ व उमरी येथील शेतकर्‍यांमुळे उघडकीस आला आहे. 

जिल्हा बॅकेच्या माजलगाव शाखेत मी वीम्याची रक्कम घेण्यासाठी पासबुक घेवून गेलो. यावेळी माझ्या पासबुक खातेक्रमांक संगणकात टाकून पाहिले. तुमच्या खात्यात 51 हजार रूपये जमा असल्याचे सांगितले. यावर मी पैसे काढण्यासाठी स्लिम भरून दिली, मात्र अचानक बॅक अधिकार्‍यांनी हे तुमचे खाते नाही. दुसर्‍यांचे असल्याचे सांगितले.  - भास्कर नाईकनवरे, शेतकरी उमरी

शेतकर्‍यांच्या बॅक खात्याबाबत ज्या चुका झाल्या आहेत. त्या बाबत माहिती घेवून शेतकर्‍यांना त्यांचे पैसे मिळवून देवू. - डी.के.शिंदे, व्यवस्थापक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रCrop Insuranceपीक विमाBeedबीड