शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : शस्त्राविना लढाई जिंकायची कशी ? एन-९५ मास्कच्या तुटवडयाने डॉक्टरांमध्ये असुरक्षिततेची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 20:46 IST

आव्हान पेलताना शासनाने डॉक्टरांना सर्व वैद्यकीय सेवा व सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.मात्र अशा स्थितीत ही रुग्णालयात अत्यावश्यक असलेल्या एन-९५ मास्क चा मोठा तुटवडा आहे.

ठळक मुद्देआवश्यकता दोन हजार मास्कची, उपलब्ध फक्त 55

- अविनाश मुडेगांवकरअंबाजोगाई-:  कोरोना विरुद्ध ची लढाई जिंकायची असेल तर आधी डॉक्टरांमध्ये सुरक्षितता निर्माण करून त्यांना सर्व वैद्यकीय सेवा,सुविधा अत्यावश्यक आहेत.या उपचार पद्धतीत महत्वपूर्ण भाग ठरलेल्या एन-९५ मास्कचा तुटवडा निर्माण झाल्याने शस्त्रा विना लढाई लढायची कशी?असा प्रश्न निर्माण झाला आहे.                  अंबाजोगाई चे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय हे सामान्य रुग्णांचे आधारस्थान असल्याने येथे रुग्णांची मोठी गर्दी असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय सज्ज ठेवण्यात आले आहे.कोरोनाचा  स्वतंत्र कक्ष रुग्णालयात स्थापन  करण्यात आला आहे. कोरोना चा संसर्ग रोखणे हे वैद्यकीय क्षेत्रासमोर मोठे आव्हान आहे.मात्र हे आव्हान पेलताना शासनाने डॉक्टरांना सर्व वैद्यकीय सेवा व सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.मात्र अशा स्थितीत ही रुग्णालयात अत्यावश्यक असलेल्या एन-९५ मास्क चा मोठा तुटवडा आहे.जिथे दोन ते पाच हजार मास्क ची आवश्यकता आहे तिथे फक्त ५५मास्क उपलब्ध आहेत.रुग्णालयात रुगणांची तपासणी दैनंदिन सुरू आहे.यात संसर्ग कोणाला?हे अद्याप समोर आले नसले तरी दररोज शेकडो रुग्ण डॉक्टरांना तपासावे लागतात.त्यांना स्वतः च्या संरक्षणासाठी एन-९५मास्क व सॅनिटायझर या महत्वपूर्ण बाबी आहेत.मात्र साध्या कापडी मास्क चा वापर करत आपला जीव धोक्यात घालुन डॉक्टर अशा स्थितीत ही काम करत आहेत.                

शासकीय रुग्णालयातच जर मास्क चा तुटवडा जाणवत असेल तर खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर व त्यांच्या कर्मचारी यांना एन-९५मास्क कधी उपलब्ध होणार? असुरक्षिततेची भावना मनात ठेवून रुग्णसेवा कशी करायची? असा सवाल अनेक डॉक्टरांनी उपस्थित केला आहे.स्वाराती रुग्णालयात सध्या फक्त ५५एन-९५ मास्क उपलब्ध आहेत.हे मास्क बाजारात ही उपलब्ध होत नाहीत.या मास्क ची मागणी प्रशासना कडे करण्यात आली आहे.ते लवकर उपलब्ध होतील.अशी माहिती स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख यांनी लोकमत'शी बोलताना दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीडdoctorडॉक्टर