शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात अंगणवाडीच्या बालकांची तहान कशी भागवायची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:04 IST

उन्हाळ्यापूर्वीच जलसंकट : जिल्ह्यात १७०० अंगणवाड्यांना नळजोडणीच नाही बीड : शासनाचे आदेश असूनही जिल्ह्यातील १७०९ अंगणवाड्यांना नळजोडणीच नसल्याने बालकांची ...

उन्हाळ्यापूर्वीच जलसंकट : जिल्ह्यात १७०० अंगणवाड्यांना नळजोडणीच नाही

बीड : शासनाचे आदेश असूनही जिल्ह्यातील १७०९ अंगणवाड्यांना नळजोडणीच नसल्याने बालकांची तहान उन्हाळ्यात कशी भागविणार असा प्रश्न आहे. बीड जिल्ह्यात २९५७ अंगणवाड्या सध्या कार्यरत आहेत. डिसेंबर २०२० मध्ये शासन निर्णयानुसार १०० दिवसांत अंगणवाड्यांना १०० टक्के नळ कनेक्शन देण्याचे आदेश होते. एका अंगणवाडीसाठी ४,९०० रुपयांपर्यंतचे अनुदान शासनाकडून मिळते. पाणीपुरवठा विभागाकडून ग्रामपंचायतीमार्फत ही नळजोडणी करण्याची योजना आहे. अंगणवाड्यांना नळजोडणी दिल्यास पिण्याचे पाण्याची सोय आणि इतर वापरासाठी पाणी उपलब्ध करण्याचा या योजनेचा उद्देश बीड जिल्ह्यातील ११८७ अंगणवाड्यांना नळ कनेक्शन देण्यात आलेले आहे. मात्र, १७०९ अंगणवाड्या अजूनही नळजोडणीच्या प्रतीक्षेत आहेत.

-----

अंगणवाड्या तूर्त बंद पण... अंगणवाड्यांना मेमध्ये जरी सुट्या असल्या तरी मार्च, एप्रिल आणि जूनपर्यंत पाण्याचा प्रश्न ऐरणीवर असतो. अंगणवाड्यांना नळजोडणी नसेल तर पाणी आणायचे कोठून हा प्रश्नच आहे. कोरोनामुळे वर्षभरापासून अंगणवाड्या बंदच आहेत. या कालावधीत सध्या अडचण जाणवत नसली तरी जेव्हा अंगणवाड्या सुरू होतील, तेव्हा तिथे नळजोडणी नसल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवू शकतो.

--------- या आहेत अडचणी

काही ठिकाणी शाळा-अंगणवाडी जोडलेल्या अथवा लगतच आहेत. तेथे आधीच जोडणी असल्याने नवीन नळ जोडणी कशाला? त्यामुळे जोडणी देण्यास तांत्रिक अडचणी आहे. काही ठिकाणी अंगणवाडीला इमारत नाही. नळजोडणीसाठी अंगणवाडी पर्यवेक्षकांकडून ग्रामसेवकाकडे रीतसर मागणी करावी लागते. ती न केल्याने नळजोडणी करणे अशक्य ठरते.

---

पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना नळजोडणीवर खर्च करण्याची तरतूद आहे. शासनाच्या स्वजलधारा, जलस्वराज्य, भारत निर्माण, राष्ट्रीय पेयजल, मुख्यमंत्री पेयजल, जलमणी, प्रादेशिक पाणीपुरवठा अशा

विविध योजनेतून नळ पाणीपुरवठा योजना स्रोत उपलब्धतेच्या ठिकाणी परिपूर्ण आहेत, तर बहुतांश ठिकाणी नळयोजना अपूर्ण आहेत. काही ठिकाणी स्रोत कोरडे अथवा बाधित आहेत. त्यामुळे अंगणवाड्यांची नळजोडणी रखडली आहे.

------

बीड जिल्ह्यात ० ते ५ वयोगटातील लाभार्थी बालके - १,८१,६९७

कार्यरत अंगणवाड्या -२९५७

-------

जिल्ह्यातील स्थिती

अंगणवाडी (मोठ्या, लहान) नळजोडणी नसलेल्या अंगणवाडी

अंबाजोगाई २५६ ७०

धारूर १४३ ४१

वडवणी १११ ४०

माजलगाव २७३ ११३

आष्टी ३७५ २१७

गेवराई ४०६ २५१

पाटोदा १६८ १०९

बीड ४३७ २९५

परळी २४५ १७९

केज २९१ २१५

शिरूर १९१ १७९ एकूण २८९६ १७०९ ----------------------------------------