धारूर : शहरात माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शहरातील पंतप्रधान घरकुल योजनेत बांधलेल्या घरांना भेट देऊन लाभार्थ्यांना चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.
येथील कॅ. राजपालसिंह हजारी स्कूलमध्ये भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नगराध्यक्ष डॉ.स्वरूपसिंह हजारी यांच्या यांच्या हस्ते स्व. वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजूर केलेल्या कृषीविषयक बिलाबाबतचे भारतीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी दिलेल्या पत्रकाचे वाटप करण्यात आले. धारूर शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेतून पूर्ण झालेल्या घरकुलांना नगराध्यक्ष डॉ. हजारी यांनी भेटी दिल्या. श्रीकांत चव्हाण,कल्पना फडतरे, नवनाथ शेळके, अंकुश शेळके, भगवान फुन्ने, जगताप यांची घरे पूर्ण झाली. या घरांची पाहणी करून प्रतिमाभेट देण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, संचालक बालासाहेब जाधव, भाजपा तालुका अध्यक्ष अॕड. बालासाहेब चोले, शहराध्यक्ष दत्ताभाऊ धोत्रे,युवा मोर्चा शहराध्यक्ष अॕड. मोहन भोसले, उपसभापती सुनील शिनगारे,माजी सभापती अर्जुन तिडके, नगरसेवक चोखाराम गायसमुद्रे,संचालक महादेव तोडें,अॕड नवनाथ पांचाळ, प्रकाश सोळंके, बाबा मुंडे, सुरेश मुंडे, मंचकराव सोळके, नामदेव चोले तसेच आवास योजना प्रकल्पावर काम करणारे विष्णू कराड उपस्थित होते.