बीड : येथील बलभीम महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.बाबासाहेब कोकाटे यांची आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेच्या वतीने ‘शिखर पुरस्कार-२०२१’साठी निवड झाली आहे. त्यांनी हिंदी साहित्यातील संशोधनाबाबत दिलेले योगदान पाहून त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला. २६ जानेवारी रोजी ऑनलाइन झालेल्या कार्यक्रमात डॉ.कोकाटे यांना पुरस्कार प्रदान झाला.
बीड बस स्थानकात खड्ड्यांचा त्रास वाढला
बीड : येथील बस स्थानकाचे सध्या नव्याने काम सुरू असून, आगार व स्थानकाचे काम केले जात आहे, परंतु सद्यस्थितीत सर्वत्र खड्डेच खड्डे झाले आहेत. त्यातून मार्ग काढताना चालकांना कसरत करावी लागत आहे, तसेच बसेसही खिळखिळ्या होत आहेत. यामुळे महामंडळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
जनजागृतीसाठी तहसीलदार बांधावर
बीड : केज तालुक्यात ई-पीक पाहणी शेकरी जनजागृती मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत आडस शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन तहसीलदारांनी शेतकऱ्यांना ध्वनिक्षेपकाद्वारे माहिती देण्यात आली. यावेळी तहसीलदार दुल्हाजी मेंडके, तलाठी चंद्रकांत कांबळे, कृषी सहायक बी.व्ही. पतंगे, ग्रामसेवक अशोक तोडकर, विकास काशीद, ग्रा.पं. सदस्य, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.