शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत महसूलच्या उच्चपदस्थ महिला अधिकारी कोरोनाबाधित; ४० कर्मचारी क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 17:08 IST

महसूल प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी महिलेस त्यांची मैत्रीण व मुलगा भेटण्यासाठी अंबाजोगाईच्या विमल सृष्टी या परिसरात आले होते.

ठळक मुद्देतालुक्यात कोरोनाचे १७ रुग्णसंपर्कातील व्यक्तींचा शोध आरोग्य विभागाच्या वतीने सुरू आहे. 

अंबाजोगाई : अंबाजोगाईत महसूल प्रशासनातील उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी सकाळी निष्पन्न झाले. त्यानंतर प्रशासनाने या अधिकारी महिलेच्या संपर्कात आलेल्या विविध विभागातील ४० कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन केले आहे. संपर्कातील व्यक्तींचा शोध आरोग्य विभागाच्या वतीने सुरूच आहे. ही यादी मोठ्या प्रमाणात वाढत जात असल्याचे समोर येत आहे. 

महसूल प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी महिलेस त्यांची मैत्रीण व मुलगा भेटण्यासाठी अंबाजोगाईच्या विमल सृष्टी या परिसरात आले होते. अंबाजोगाईत आल्यानंतर ती मैत्रीण महिला बाधित निघाली. त्यानंतर त्या उच्चपदस्थ अधिकारी महिलेचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आल्यानंतर ती महिला अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्या. त्यानंतर त्यांच्या संपर्कात असलेल्या शासकीय वाहनचालक, विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी याशिवाय त्यांच्या भेटीसाठी गेलेले सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी अशा चाळीस जणांना आरोग्य विभागाने क्वारंटाईन होण्याच्या सूचना दिल्या आहेत. संपर्कातील व्यक्तींचा शोध आरोग्य विभागाच्या वतीने सुरू आहे. 

रविवारी झाली होती बैठकमहसूल प्रशासनातील उच्चपदस्थ  महिला अधिकारी यांनी रविवारी अंबाजोगाईच्या एका  कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीस अंबाजोगाई, परळी, केज, धारूर व माजलगाव येथील महसूल, कृषी, वन विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहिले होते. या शिवाय अंबाजोगाई येथील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीतील कोणाकोणाचा संपर्क आला. याचा शोध आरोग्य विभागाच्या वतीने सुरू आहे. ही यादी किती लांबत जाते. हे आरोग्य विभागाच्या संशोधनावर ठरणार आहे. संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध आरोग्य विभागाच्या वतीने सुरू आहे.  आवश्यकतेप्रमाणे त्या त्या व्यक्तींचे स्वॅब घेऊन तपासणी करण्यात येणार आहे. असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

तालुक्यात कोरोनाचे १७ रुग्णअंबाजोगाई शहरात कोरोनाचे १४ तर अंबाजोगाई तालुक्यात बागझरीत २ तर हनुमंतवाडी १ असे एकूण १७ रुग्ण आढळून आले आहेत. शहरात झपाट्याने रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आजपर्यंत अंबाजोगाई परिसरात ७ ठिकाणी कन्टेमेंट झोन लागू करण्यात आला आहे. शहरी भागातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी याची धास्ती घेतली आहे. 

टॅग्स :Beedबीडcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस