शहरं
Join us  
Trending Stories
1
आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
2
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
3
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
4
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
5
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
6
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
7
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
8
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
9
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
10
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
11
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
12
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
13
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
14
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
15
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
16
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
17
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
18
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
19
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
20
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट

झुडपात लपवलेले खंजीर, गुप्ती जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 00:20 IST

सुमित वाघमारे या युवकाचा खून करण्यासाठी वापरलेले खंजीर व गुप्ती ही दोन्ही हत्यारे गुरुवारी दुपारी बीड तालुक्यातील जिरेवाडी परिसरात जप्त करण्यात आली आहेत. ही हत्यारे एका झुडपात लपवून ठेवली होती.

ठळक मुद्देवाहने बाकीच : बंदोबस्तात पेठबीड पोलिसांचा तपास सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सुमित वाघमारे या युवकाचा खून करण्यासाठी वापरलेले खंजीर व गुप्ती ही दोन्ही हत्यारे गुरुवारी दुपारी बीड तालुक्यातील जिरेवाडी परिसरात जप्त करण्यात आली आहेत. ही हत्यारे एका झुडपात लपवून ठेवली होती. गुरुवारी सकाळपासूनच पेठबीड पोलीस खुनाच्या तपासासाठी बाहेर पडले होते. विशेष म्हणजे हा तपास मोठ्या बंदोबस्तात केला जात आहे.१९ डिसेंबर रोजी सुमित वाघमारे या युवकाचा प्रेमप्रकरणातून पत्नी भाग्यश्रीच्या समोरच बालाजी लांडगे व संकेत वाघ यांनी धारदार शस्त्राने वार करून खून केला होता. तसेच त्यांना कृष्णा व गजानन क्षीरसागर यांनी सहकार्य केल्याचे निष्पन्न होताच, त्यांना अटक केली होती. हे सर्व जण सध्या पोलीस कोठडीत आहेत. याप्रकरणाचा तपास पेठबीड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज उदावंत हे करीत आहेत.सुमितचा काटा काढण्यासाठी वापरलेली हत्यारे, वाहने जप्त करण्यासाठी गुरूवारी सकाळीच पेठबीड पोलीस बाहेर पडले. दुपारच्या सुमारास जिरेवाडी शिवारात एका झुडपात लपवून ठेवलेले खंजीर व गुप्ती पोलिसांच्या हाती लागले. ते जप्त करण्यात आलेले आहे. तसेच वाहने जप्त करण्यासाठी पोलिसांनी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत पेठबीड पोलीस तपासासाठी बाहेरच होते, असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.हा तपास पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पेठबीड ठाण्याचे सपोनि पंकज उदावंत हे करीत आहेत. त्यांच्यासोबत सुनील अलगट, किशोर जाधव, अनिल शेळके, महेंद्र ओव्हाळ, महेंद्र साळवे, कृष्णा बडे, शशिकांत जाधव, भगवान खाडे हे कर्मचारीही तपासकामी मदत करीत आहेत.हत्यार लपविल्यानंतर गजानन फरारबालाजी व संकेतने सुमितला संपविल्यानंतर कार अयोध्यानगरात सोडली. त्यानंतर त्यांना सोबत घेऊन गजानन क्षीरसागर हा गेवराईच्या दिशेने गेला. जिरेवाडी शिवारात गजाननने दुचाकी थांबविली. बालाजी जवळील खंजिर व गुप्ती ताब्यात घेत रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एका झुडपात लपवून ठेवली. कोणाला दिसणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली होती. त्यानंतरच गजाननने दोघांच्या हाती दुचाकी सोपवित तो बीडला परतला होता, असे पोलीस सूत्रांकडून समजते. गुरूवारी दुपारी हे दोन्ही हत्यारे पोलिसांनी जप्त केले आहेत.

टॅग्स :BeedबीडMurderखूनCrime Newsगुन्हेगारी