शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

औषधांसाठीची हेल्पलाईनच ‘डेड’; ७०० तक्रारी; एकीचीही दखल नाही

By सोमनाथ खताळ | Updated: October 7, 2023 05:19 IST

सरकारी दवाखान्यात आलेल्या प्रत्येक रुग्णाला सर्व औषधे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित संस्थेवर दिली.

सोमनाथ खताळ

बीड : सरकारी दवाखान्यात आलेल्या प्रत्येक रुग्णाला सर्व औषधे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित संस्थेवर दिली. जर असे केले नाही तर १०४ क्रमांकावर तक्रारी करा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

म्हटले होते.  स्वातंत्र्य दिनापासून आतापर्यंत ७०० तक्रारी टोल फ्री क्रमांकावर आल्या आहेत. याची कसलीही दखल घेतली जात नसल्याचे वास्तव आहे. रुग्णांना खासगी मेडिकलमधूनच औषध खरेदी करावी लागत आहेत.

१५ ऑगस्टपासून सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये औषध-गोळ्यांसह तपासणी व उपचार मोफत करण्यात आले. त्यामुळे डॉक्टरांपुढे रांगा लागत आहे. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या गोळ्यांपैकी मोजक्याच गोळ्या सरकारी दवाखान्यात मिळत आहेत. इतर औषधे खासगीतून विकत घ्यावी लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत आहे.  त्याच्या तक्रारी राज्यभरातून येत आहेत.

‘लोकमत’ने काय पाहिले...

बीड जिल्हा रुग्णालयात २९ ऑगस्ट रोजी तरुणीचे पोट दुखत असल्याने तपासणी करण्यात आली. त्यात २ गोळ्या तिला दिल्या. इतर दोन नाहीत असे सांगण्यात आले. म्हणून तिच्या नातेवाइकांनी १०४ क्रमांकावर कॉल केला. परंतु, अद्यापही याची कसलीही दखल घेतलेली नाही. ऑक्टोबरमध्ये याची विचारणा केल्यावर अद्याप माहिती मिळाली नाही, असे सांगण्यात आले.

बीड रुग्णालयातच ऑक्टोबरमध्ये एका तरुणाला पाच प्रकारची औषधे दिली. यातील दोन मिळाली तर तीन मिळाली नाहीत. याचीही तक्रार १०४ वर केली. परंतु, त्याचीही कसलीच दखल घेतली नाही. 

१०४ टोल फ्री क्रमांक नावालाच

औषधे मिळत नाहीत म्हणून १०४ या टोल फ्रीवर तक्रारी करण्यास सांगितले, परंतु त्या तक्रारी निकाली निघाल्या का? याचा कसलाही आढावा घेतला जात नाही. केवळ टोल फ्री क्रमांक देऊन शासन हात झटकत आहे.