शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वराह चोरीच्या कारणावरुन बीडच्या महिलेस वडवणीत ठेवले डांबून; ९ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:13 IST

शहरातील बसस्थानकाच्या मागे राहणाऱ्या शिकलककर कुटुंबातील मुलाने वडवणी येथे वराह चोरी केल्याच्या संशयावरुन, त्याच्य आईचे अपहरण करुन मारहाण केल्याची घटना शुक्रवारी शहरातील बसस्थानकामागे उघडकीस आली.

बीड : शहरातील बसस्थानकाच्या मागे राहणाऱ्या शिकलककर कुटुंबातील मुलाने वडवणी येथे वराह चोरी केल्याच्या संशयावरुन, त्याच्य आईचे अपहरण करुन मारहाण केल्याची घटना शुक्रवारी शहरातील बसस्थानकामागे उघडकीस आली. मारहाणीत महिलेचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ९ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अपहरण केलेल्या महिला राधा हिराचंद शिकलकरी राहणार बीड बसस्थानकाच्या मागे. त्यांच्या मुलाने वडवणी येथे वराह चोरल्याचा संयश त्यांच्या नात्यातीलच रणवीरसिंग माणिकसिंग टाक व इतरांना होता. या कारणावरुन ११ जून रोजी पहाटे २ वाजता पालासमोर झोपलेल्या राधा शिकलकरी यांचे ९ जणांनी चारचाकीच्या सहाय्याने अपहरण केले. त्यानंतर त्यांना वडवणी येथे नेऊन बेदम मारहाण करण्यात आली. यात राधा यांचा एक पाय फ्रॅक्चर झाला आहे. दरम्यान, राधा यांचे पती व इतर नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला तेव्हा त्यांना वडवणी शिवारात डांबून ठेवल्याची माहिती मिळाली. तीन दिवसांपूर्वी नातेवाईकांनी तेथे जाऊन राधा यांची सुटका करुन आणली. त्यानंतर राधा यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले.शुक्रवारी राधा शिकलकरी यांच्या फियार्दीवरुन रणवीरसिंग नानकसिंग टाक, कृष्णा नानकसिंग टाक, सूरज नानकसिंग टाक, विजूसिंग मनोहरसिंग टाक, मोहबतसिंग चंदूसिंग टाक, कृष्णा गुरुसिंग टाक, सूरजसिंग टाक, लांडूकर नम्मतसिंग टाक, शरबत कौर नानकसिंग टाक (सर्व रा. वडवणी) या ९ जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अपहरण व मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक फौजदार हरिश्चंद्र गिरी करत आहेत.पायाला प्लॅस्टर केलेल्या अवस्थेत महिला पोलीस अधिक्षक कार्यालयातअपहरण झालेल्या राधा शिकलकर यांचा मारहाणीत पाय मोडला होता. त्यांच्या पायाला प्लास्टर करण्यात आले होते.गुन्हा नोंद करुन घेतला जात नाही यामुळे शुक्रवारी राधा यांचे कुटुंब त्यांना पाय मोडलेल्या अवस्थेमध्ये पोलीस अधिक्षक कार्यालयात घेऊन आले होते.त्यानंतर पोलीस उपअधीक्षक भास्कर सावंत यांच्याशी नातेवाईकांनी चर्चा केली व आपले म्हणणे मांडले.त्यानंतर त्यांनी गुन्हा नोंद करुन घेण्यासंदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.भास्कर सावंत यांच्या सांगण्यावरुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी महिलेसह कुटुंब आले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करुन घेतला.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी