शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

बीड जिल्ह्यात छावण्या उघडा किंवा चाऱ्यासाठी मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:09 IST

सध्याची परिस्थिती बिकट आहे, तलावातील पाणी आटले आहे, जनावरांना चारा नाही, आता खºया अर्थाने मदतीची गरज आहे. त्यासाठी एकतर शासनाने छावण्या उघडाव्यात अन्यथा, जनावरांच्या संख्येनुसार शेतक-यांच्या खात्यावर चा-यासाठी थेट मदत द्यावी, अशी मागणी आ. जयदत्त क्षीरसागर यांनी केली.

ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागरांची मागणी : बांधावर जाऊन दुष्काळ पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सध्याची परिस्थिती बिकट आहे, तलावातील पाणी आटले आहे, जनावरांना चारा नाही, आता खºया अर्थाने मदतीची गरज आहे. त्यासाठी एकतर शासनाने छावण्या उघडाव्यात अन्यथा, जनावरांच्या संख्येनुसार शेतक-यांच्या खात्यावर चाºयासाठी थेट मदत द्यावी, अशी मागणी आ. जयदत्त क्षीरसागर यांनी केली. ते बहीरवाडी, पिंपळनेर, नाळवंडी सर्कलच्या दौ-यावर होते.यावेळी डॉ. योगेश क्षीरसागर, रोहित क्षीरसागर, दिनकर कदम, अरूण डाके, दिलीप गोरे, विलास बडगे, गणपत डोईफोडे, अ‍ॅड.राजेंद्र राऊत, नगरसेवक विनोद मुळूक आदिंची प्रमुख उपस्थिती होती.या दौºयात त्यांच्या समवेत अरुण बोंगाणे, देवीलाल चरखा, गोरख दंने, जयदत्त थोटे यांच्यासह बहीरवाडी, पिंपळनेर, नाळवंडी सर्कलमधील कार्यकर्ते, शेतकºयांची उपस्थिती होती.दुष्काळाचे चटके : ग्रामीण भागात जास्त४आ. जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, लोकांमध्ये उत्साह नाही, सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणखी ९ महिने जायचे आहेत. आणखी परिस्थिती गंभीर होणार आहे. कुठेही जा गुडघ्याच्यावर पिके दिसत नाहीत. जनावरांना चारा, पाणी नाही, बैलजोडी, म्हशी, दुभती जनावरे दावणीला बांधून ठेवता येणार नाहीत.४सरकारने आता तातडीने मदत करण्याची गरज आहे. आता खºया आधाराची गरज आहे, तलाव आटले आहेत, धरणे कोरडी पडू लागली आहेत. त्यात १ ते २ महिने भागेल एवढेच पाणी आहे. पुढे काय ? काही दिवसांपूर्वीच सर्व अधिकारी व पत्रकारांना बरोबर घेऊन माजलगाव धरणावर जाऊन पहाणी केली. शहराला दररोज २ कोटी लिटर पाणी लागते. भविष्यात ४ कोटी लिटर पाणी लागणार आहे. त्याचे नियोजन आतापासूनच करता यावे, यासाठी अमृत अटल योजना महत्त्वाची ठरणार आहे. यासाठी केंद्रीय स्तरावर आपण पाठपुरावा करून ही योजना प्राधान्याने मंजूर करून घेतली.४उमरद खालसा हे बीड जवळचे गाव आहे. अनेकजण शहरात राहतात परंतु, ग्रामीण भागात दुष्काळ अधिक तीव्र जाणवतोय. बीड ते सुर्डी माजलगाव या रस्त्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचा प्रस्ताव दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरAgriculture Sectorशेती क्षेत्र