शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

वेळीच पट्टी न केल्याने रुग्णाच्या जखमेत झाल्या आळ्या; बीड जिल्हा रुग्णालयात हलगर्जीपणाचा कळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 11:42 IST

उपचारात हलगर्जी करणाऱ्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

ठळक मुद्दे बीड जिल्हा रूग्णालयातील संतापजनक प्रकार दोषी डॉक्टरांवर कारवाईची मागणी

बीड : झाडावरून पडलेल्या व्यक्तीच्या डोक्याला जखम झाली. त्यानंतर तब्बल तीन दिवस होऊनही पट्टी न बदलल्याने त्या जखमेवर आळ्या पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपचारात हलगर्जी करणाऱ्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी मंगळवारी याचा अहवाल मागविला आहे.

ज्ञानदेव निवृत्ती वीर (५५ रा.पाली जि.बीड) हे शेळीला पाला काढण्यासाठी झाडावर चढले होते. याचवेळी त्यांचा तोल गेल्याने खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. ही घटना शुक्रवारी घडली होती. त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी डोक्याला जखमेच्या ठिकाणी सात टाके घेऊन वॉर्ड क्रमांक पाच मध्ये शरीक केले. या जखमेची पट्टी एक दिवसाआड बदलणे गरजेचे होते. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांची हलगर्जी आणि डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे तीन दिवसानंतरही ही पट्टी बदलण्यात आली नाही. अखेर नातेवाईकांनी आक्रमक होत उपचाराची मागणी करताच डॉक्टरांनी पट्टी बदलली. यावेळी जखमेमध्ये काही आळ्या दिसून आल्या. या घटनेने आरोग्य विभागाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.दरम्यान, एकीकडे सरकारी रूग्णालयांमध्ये पहिल्यापेक्षा चांगल्या सुविधा मिळू लागल्याने सामान्यांचा ओढा वाढला आहे. मात्र, काही कामचुकार डॉक्टरांमुळे रुग्णांचा जीव धोक्यात येत आहे. आता या प्रकरणातही असाच काहीसा प्रकार घडला आहे. यातील दोषी डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

प्रकार कानावर आला आहे. याचा अहवाल मागविला आहे. चौकशी करून दोषी कर्मचारी, डॉक्टरांवर कारवाई केली जाईल. - डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडdoctorडॉक्टरmedicineऔषधं