शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात दमदार पाऊस; सहा मंडळात अतिवृष्टीची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 11:40 IST

धारूर शहराजवळ अंबाचौंडी नदीला तसेच घागरवाडा नदीला आलेल्या पुरामुळे ग्रामस्थांना दोन तास ताटकळावे लागले.

बीड : जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत मागील 24 तासात  बीड, आष्टी, शिरूर आणि धारूर या चार तालुक्यांतील एकूण सहा मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. तसेच आष्टी तालुक्यात मागील 24 तासात 65 मिमी सरासरी पाऊस झाला.

गुरुवारी दुपारी जिल्ह्यातील केज, धारुर, वडवणी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे परिसरातील नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या तर नाले ओसंडून वाहत आहेत. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून खरीप पिकांना चांगला फायदा होणार आहे. कुंडलिक प्रकल्पाचे तीन दरवाजे गुरुवारी रात्री उघडण्यात आले.

धारूर शहर व तालुक्यात गुरूवारी दुपारी दमदार पावसामुळे सर्व नद्या, नाले, ओढे ओसंडून  वाहत होते. तालूक्यातील चोरांबा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने चारदरी व ढगेवाडीचा रस्ता तीन तास बंद होता. तर धारूर शहराजवळ अंबाचौंडी नदीला तसेच घागरवाडा नदीला आलेल्या पुरामुळे ग्रामस्थांना दोन तास ताटकळावे लागले.

दरम्यान दुपारी चारच्या सुमारास वडवणी शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस सुरू झाला. केज तालुक्यातील बनसारोळा, येवता, आपेगाव परिसरातही दोन ते तीन तास पावसाने दमदार हजेरी लावली. तर कोरेगाव येथील नदी दुथडी भरुन वाहत होती.  गेवराईसह शिरसदेवी आणि अन्य गावांत चांगला पाऊस झाला. बीडमध्ये सायंकाळच्या सुमारास हलक्या सरी कोसळल्या.

आष्टी तालुक्यातील घाटापिंपरी व परिसरात पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी आहेत. तालुक्यातील ब्रह्मगाव, आष्टी, पोखरी, मुर्शदपूर, कºहेवाडी, करंजी भागामध्ये चांगला पाऊस झाल्याचे वृत्त आहे. शिरुर कासार येथे रात्री ८ वाजेपासून १० वाजेपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली. माजलगाव धरणाच्या पाणीपातळीमध्ये कमालीची वाढ झाली आहे.

टॅग्स :BeedबीडRainपाऊस