पथदिवे बंद
अंबाजोगाई : शहरातील अनेक भागांमध्ये पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांची गैरसोय होते. याप्रकरणी नगरपालिकेकडे नागरिकांनी वेळोवेळी तक्रार करूनही संबंधित वाॅर्डातील नगरसेवक व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. याकडे लक्ष देऊन पथदिवे रात्री सुरू ठेवावेत, अशी मागणी आहे.
स्थानकात अस्वच्छता
केज : येथे मागील दोन वर्षांपूर्वी बसस्थानक बांधण्यात आलेले आहे. तरीदेखील बसस्थानक परिसरातील अस्वच्छतेचा प्रश्न मात्र कायम आहे. नागरिकांसाठी स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. मात्र, त्यामध्ये साफसफाई केली जात नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आहे
वृक्षतोड थांबवा
केज : तालुक्यातील अनेक भागांमधून झाडांची कत्तल बेसुमार केली जात आहे. याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असून, सॉ-मिलचालक मात्र मोठ्या प्रमाणावर नफा कमवत आहेत. तहसीलदारांची परवानगी झाडे तोडण्यासाठी आवश्यक आहे. मात्र, अशा प्रकारे परवानगी न घेता झाडे तोडण्यावर भर दिला जात आहे.