गेवराई : तालुक्यातील गढी येथील जय भवानी सहकारी साखर कारखाना येथे ऊसतोड मजूर, बगँस कंत्राटदाराकडील मजूर, शुगर हाऊस व गोडाऊन हमाली करणारे मजूर तसेच कारखाना कर्मचारी या सर्वांची शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी २७ डिसेंबर रोजी आरोग्य तपासणी केली. यावेळी जवळपास ६० मजुरांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.
या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर म्हणून स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. लेंडगुळे , बालरोगतज्ज्ञ डॉ. रौफ, मधुमेहतज्ज्ञ डॉ. धनंजय माने उपस्थित होते. शिबिरात साधारणपणे ५०-६० लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली व औषधीचे वाटप करण्यात आले. तसेच विविध रक्ताच्या तपासण्या करण्यात आल्या.
या शिबिरास जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे, कामगार कल्याण अधिकारी भोसले, वैद्यकीय अधिकारी डॉ. संभाजी पवार, व्हेईकल इंचार्ज विष्णू, कॅशियर उद्धव पारे, गायकवाड, शेतकी विभागाचे सेक्शन इंचार्ज अमर खरात, शिवाजी झिंगरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविकात निपाणी जवळका प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ धनंजय माने यांनी आरोग्याचे महत्त्व सांगितले. तसेच आरोग्य शिबिरासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल कारखाना व्यवस्थापनाचे आभार मानले.
आरोग्य विभागाचे कर्मचारी, उपकेंद्राअंतर्गत असणाऱ्या सर्व आशा, गढी उपकेंद्राचे डॉ वैभव दहिफळे, मीरा बुंदले, शिल्पा, नरवाडे, होनमाणे, राठोड, भोंडवे या सर्वांनी डॉ. धनंजय माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर उत्कृष्टरित्या पार पाडले. डॉ. दहिफळे यांनी आभार मानले.