शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोडणीला जाण्यापूर्वीच ३ हजार कामगार महिलांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 12:29 IST

गर्भपिशवी शस्त्रक्रिया प्रकरणानंतर आरोग्य विभागाची दखल

ठळक मुद्देबीड जिल्ह्यामधून झाली सुरूवात बीडमध्ये २८ हजार ऊसतोड महिला कामगार

बीड : बीड जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या १३ हजार गर्भपिशवी शस्त्रक्रिया प्रकरण राज्यात गाजले होते. यावर चौकशी समितीने ऊसतोडीला जाण्यापूर्वी आणि आल्यावर आरोग्य तपासणीचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे बीड आरोग्य विभागाने शनिवारी जिल्ह्यातील ३ हजार ९२ महिला कामगारांची आरोग्य तपासणी केली. राज्यात सर्वत्र अशा तपासणी केल्या जाणार असून बीड जिल्ह्यातून याची सुरूवात झाली आहे.

बीड जिल्ह्यातील ऊसतोडणीला गेलेल्या आतापर्यंतच्या सर्व महिलांचे सर्वेक्षण आरोग्य विभागाने केले होते. यामध्ये जिल्ह्यात १३ हजार महिलांच्या गर्भपिशवी शस्त्रक्रिया झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर निलम गोºहे यांच्या समितीने विविध सुचना सुचवून शासनाकडे सादर केल्या होत्या. यामध्ये कामगार महिलांची ऊसतोडणीला जाण्यापूर्वी आणि परत आल्यावर आरोग्य तपासणी करण्याचा मुद्दा होता. त्यानंतर आरोग्य संचालकांनी सर्व राज्यात तसे आदेश काढले. त्याप्रमाणे बीडमध्ये शनिवारी सर्व ५० प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी कामगार महिलांच्या मुलांचीही आरोग्य तपासणी करण्यात आली. 

आयुर्मंगलम कार्डचेही वाटपआरोग्य तपासणी झालेल्या सर्व महिलांचे बँक खाते उघडण्यात आले. त्यांना आरोग्य, गोल्डन व आयुर्मंगलम कार्ड देण्यात आले. हे कार्ड जेथे कामासाठी गेले आहेत, तेथील आरोग्य केंद्रात दाखविल्यास उपचार करणे सोपे होणार आहे. तसेच मोफत उपचार केले जाणार आहेत. आतापर्यंत पहिल्यांदाच असा प्रयोग राबविण्यात आला आहे.

बीडमध्ये २८ हजार ऊसतोड महिला कामगारमिळालेल्या माहितीनूसार जिल्ह्यात २८ हजार ७०१ महिला ऊसतोडणीसाठी जाणार आहे. पैकी ३ हजार ९२ महिलांची आरोग्य तपासणी करून उपचार करण्यात आले. ७०३ महिलांना विविध आजार असल्याचे तपासणीतून समोर आले. 

जिल्ह्यातील ५० प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थिती ऊसतोड कामगार महिला व त्यांच्या मुलांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. जिल्ह्यातील ५० प्राथमिक आरोग्य केंद्रात तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. तपासणी केलेल्या महिलांना आरोग्य, गोल्डन व आयुर्मंगलम कार्डचे वाटप केले. तसेच त्यांचे बँक खातेही उघडून देण्यात आले. एका दिवसात ३०९२ महिलांची तपासणी केली. - डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

टॅग्स :WomenमहिलाBeedबीडdoctorडॉक्टरHealthआरोग्यSugar factoryसाखर कारखाने