शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्र वाऱ्यावर सोडून डॉक्टर गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 23:35 IST

पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन्ही वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्र वाºयावर सोडून तासन्तास गायब असतात.

ठळक मुद्देरुग्णांचे हाल : अंमळनेर येथील प्रकाराने सामान्यांमध्ये संताप; दांडीबहाद्दर डॉक्टरांची होणार चौकशी

बीड/कुसळंब : पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन्ही वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्र वाºयावर सोडून तासन्तास गायब असतात. यामुळे सामान्य रुग्णांचे हाल होत आहेत. विशेष म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या भेटीतही दोन्ही अधिकारी गैरहजर असल्याचे समोर आले आहे. अशा कामचुकार डॉक्टरांमुळे आरोग्य विभागाची प्रतिमा मलीन होत असल्याची चर्चा आहे.अंमळनेर, पिंपळवंडी, मिसाळवाडी, कोतन, डागाचीवाडी, शरदवाडी, जरेवाडी, धोपटवाडी आदी गावांतील लोक अंमळनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येतात. मात्र, येथील वैद्यकीय अधिकारी कायम गैरहजर रहात असल्याने नागरिकांना रिकाम्या हाताने परतून खाजगी रुग्णालयाचा रस्ता धरावा लागतो. यामुळे सामान्यांना सरकारी रुग्णालय असतानाही आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. गुरुवारीही केंद्रातील डॉक्टर वेळेवर हजर नव्हते. तसेच सायंकाळच्या सुमारासही काही रुग्णांनी डॉक्टर नसल्याच्या तक्रारी केल्या. कायम गैरहजर राहून रुग्णांची हेळसांड करणाºया डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी सामान्यांमधून होत आहे. परिसरातील आठ ते दहा गावातील रुग्ण उपचारासाठी या ठिकाणी येतात. मात्र, अधिकारीच जागेवर नसल्यास त्यांना हेलपाटा होता. परिणामी रुग्णालयातील तसेच औषधांवरील खर्च सहन करावा लागतो.राजकीय नेत्यांकडून दबाव टाकण्याचा प्रयत्नआम्ही कसेही काम करु, आम्हाला कोणीच काही करु शकत नाही, असे म्हणत येथील डॉक्टर सामान्य रुग्णांना धमकावतात. आमची तक्रार केली तरी, ‘आमची ओळख वरपर्यंत आहे’ असे सांगून दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. अनेकवेळा वरिष्ठांवरही येथील डॉक्टरांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Beedबीडdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल